Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्रसिद्ध रॅपर हार्ड कौर संघावर उखडली , म्हणाली तुम्ही वंशवादी आणि खूनी आहात आणि खूप काही ….

Spread the love

लंडनस्थित बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर हार्डकौर आज संघावर चांगलीच उखडली आपल्या इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये तिने म्हटले आहे कि , २६/११ असो कि पुलवामा हल्ला आणि देशातील सर्व दहशतवादी कारवायांना आर एस एस जबाबदार आहे . तुमच्या या कारवायांमुळेच सरदार पटेलांनी तुमच्यावर महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर बंदी आणली होती. घटनेने जातीयवाद हा कायद्याने गुन्हा मानला असला तरी तुमचे वर्तन नेहमीच जातीयवादी राहिले आहे. बुद्ध आणि महावीरांनी जाती व्यवस्था आणि ब्राह्मणी विचारधारेविरुद्ध बंड केले . छत्रपती शिवाजी महाराज आणि अशोका यांचाही अंत याच वंशवादी विचारधारेने केला. ईशान्य भारताचीही दुर्दशाही संघी विचारधारेमुळेच झाली असल्याचा जाहीर आरोपही  कौर हिने केला आहे. तुम्हाला आता आम्ही आणखी सहन करणार नाही . तुम्ही राष्ट्रवादी नाही तर केवळ वंशवादी आहेत आणि खुनी आहात.

I HAVE A SOUND RECORDING OF THE EDITOR EX IGP OFFICER S.M MUSHRIF ABOUT THE HEMANT KARKARE’S MURDER & EXPOSING MANY…

Posted by Hard Kaur on Tuesday, June 18, 2019

शेवटी तिने म्हटले आहे कि , संघाच्या विचारधारेविरुद्ध लढण्यासाठी उठा . जागे व्हा . तुम्ही तुमच्या बहिणींवर, मुलींवर बलात्कार होण्याची वाट पाहात आहात का? की त्यांनी तुमच्यावर हल्ला करावा म्हणून तुम्ही थांबले आहात?,’ असं आवाहन तिने केलं आहे. संघाला लक्ष्य करताना तिने अत्यंत रोखठोक  भाषेचा प्रयोग केला आहे. याआधीही तिने हेमंत करकरे व गौरी लंकेश यांच्या हत्येचा ठपका संघावर ठेवला होता. आपल्या फेसबुक अकाउंटवरही तिने भारतातील जातीयवादाच्या विरोधात व्हिडीओ आणि पोस्ट टाकल्या आहेत .

हार्डकौर  हि प्रसिद्ध रॅपर असून ‘पैसा फेंक तमाशा देख’ हे तिचं गाणं प्रचंड गाजलं होतं. यासोबतच तिने बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे . अर्थात संघावर  अशा टीकांचा काहीही परिणाम होत नाही शिवाय जे लोक संघ विरोधी आहेत ते आहेतच पण संघाच्या कार्यकर्त्यांवरही त्याचा काही परिणाम होत नाही पण संघावरील अत्यंत कडव्या टीकेमुळे चर्चा तर होणार आई एवढे मात्र नक्की .

 

View this post on Instagram

RSS IS RESPONSIBLE FOR ALL TERRORIST ATTACKS IN INDIA INCLUDING 26/11, PULWAMA ATTACK. THE FACE OF ALL PROBLEMS IN INDIA. CONSTITUTIONAL CASTEISM IS A CRIME. YOU MOFO’S YOU ARE BANNED BY SARDAR PATEL JI AFTER GANDHI’S MURDER BY GODSE. YOU ARE NOT ALLOWED TO FUNCTION. IN HISTORY MAHATMA BUDDHA AND MAHAVIR FOUGHT AGAINST THE BRAHMINICAL CASTE SYSTEM. RSS FUCKED THE NORTHEAST,1984, SHIVAJI’S DEATH AND ASHOKA. MILLIONS. ALL KILLED BY THIS RACIST PARTY FROM THE DAY INDIA EXISTS. #fuckrss WE WILL NOT EXCEPT THIS ANYMORE. YOU ARE NOT A NATIONALIST, YOU ARE A RACIST MURDERER 💯 #fact WAKEUP OR ARE YOU WAITING FOR YOUR SISTER,DAUGHTER TO GET RAPED OR YOU WAITING UNTIL THEY START ATTACKING YOU AND YOURS ?? !! SHARE NOW!!! @bbcworldservice @cnn @bbcasiannetwork @bbcnews @channel4news @thetimesofindia @hindustantimes @ghaintpunjab @bombaytimes @officialhumansofbombay @punjab2000 @desiblitzz @delhi.times

A post shared by HARDKAUR (@officialhardkaur) on

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!