Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

योग करीत नसल्यानेच काँग्रेसची अधोगती : योग्य गुरु रामदेव

Spread the love

महाराष्ट्रातील योगदिनाच्या मुख्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दाखल झालेल्या योगगुरू बाबा रामदेव यांनी आज अत्यंत सूचक शब्दांत योगावरूनच काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसचं सध्याचं नेतृत्व योग करत नसल्यानेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव पाहावा लागला, असा दावा रामदेव यांनी केला.

योगाचे महत्त्व सांगण्यासाठी रामदेव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा दाखला दिला. योग केल्यास ‘अच्छे दिन’ नक्कीच येतात. पंतप्रधान मोदी सार्वजनिकपणे योग करतात. माजी पंतप्रधान नेहरू व इंदिराजीही कुणाच्या नकळत योग करायचे. मात्र काँग्रेसची नंतरची पिढी योगापासून दूर गेली आणि तिथेच त्यांची राजकारणातील गणितं बिघडली, असा टोला रामदेव यांनी लगावला.

जागतिक योग दिन २१ जून रोजी साजरा करण्यात येणार असून या दिनाची जय्यत तयारी सर्वत्र सुरू आहे. यंदा योगदिनानिमित्त महाराष्ट्रात नांदेड येथे मुख्य कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह योगगुरू बाबा रामदेव यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या पार्श्वभूमीवर रामदेव यांनी आज विधानभवनात मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर रामदेव यांनी विधिमंडळ वार्ताहर संघात शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. यावेळी रामदेव यांनी प्रात्यक्षिकासह योगाच्या खास टिप्स दिल्या. शेलार यांनीही यावेळी रामदेव यांचे योगाचे धडे आत्मसात केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!