Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : निविदा निघाल्या पण , बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी कंत्राटदार मिळेना, सेनेच्या ताब्यात असलेल्या मनपाची शोकांतिका

Spread the love

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कंत्राटदार मिळू नये ही अतिशय दुर्देवी गोष्ट – संजय राऊत

राज्यात शिवसेना धूम धडाक्यात शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करीत असली तरी बहुचर्चित बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला औरन्गाबाद शहरात कंत्राटदार मिळत नसून याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे . या विषयावर बोलताना केवळ निधी अभावी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या औरंगाबाद येथील स्मारकासाठी कंत्राटदार मिळू नये ही अतिशय दुर्देवी आणि गंभीर गोष्ट आहे. या संदर्भात आपण शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी बोलून हा प्रश्न निकाली काढू असे खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे औरंगाबाद महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून सेना -भाजपची सत्ता आहे तरीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी महापालिकेने आतापर्यंत तीन वेळा निवीदा काढूनही कोणी कंत्राटदार मिळंत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

याविषयी अधिक विचारणा केली असता असे सांगण्यात येते कि , आतापर्यंत अनेक कंत्राटदारांची बिले थकली असून त्यामुळे औरंगाबाद महापालिकेवर ही परिस्थिती ओढवली आहे. या प्रकरणात आपण लक्ष घालणार असून महापौर नंदू घोडेले, महापालिका आयुक्त यांच्याशी सुध्दा याबाबत चर्चा करणार असल्याचे राऊत म्हणाले.

मुंबईत आंतरराष्र्टीय दर्जाचे बाळासाहेबांचे स्मारक उभे राहात आहे तर औरंगाबादेत कंत्राटदार मिळंत नाही हा खूप गंभीर प्रकार असून याबाबत लवकर पावले उचलत आहोत असे राऊत म्हणाले.

अनेक त्रुटींमुळे महापालिका आयुक्त निपूण विनायक यांनी गेल्या दोन वर्षांपासून ठेकेदारांचे १६० कोटी रुपयांचे बीले थांबवली आहेत. शिवाय झालेल्या कामाचे मूल्यमापन व्यवस्थित न झाल्याचा  आरोप महापालिका प्रशासनाकडून ठेकेदारांवर केला जातो. या वादामुळे संतापलेल्या ठेकेदारांनी बाळासाहेब ठाकरे स्मृती भवनाचे काम घेण्यास नकार दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!