Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अनाथांची मदत करण्याचे कारण सांगून विदेशी महिलेने घातला भिक्षुकाला २ कोटींचा गंडा

Spread the love

अनाथांची मदत करण्याचे कारण देऊन एका विदेशी महिलेने कर्नाटकातील एका बौद्ध भिक्षूला २ कोटींचा गंडा घातला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी कर्मा खेदप याने कारवार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे. ७३ वर्षांचे कर्मा खेदप मुळचे तिबेटचे रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून कारवार शहरात राहत आहेत. काही दिवसांपूर्वी एका अमेरिकी महिलेने फेसबुकच्या माध्यमातून खेदप यांच्याशी संपर्क साधला. भारतातील अनाथांसाठी काम करायचं आहे अशी इच्छा तिने व्यक्त केली. १७ कोटींची गुंतवणूक करून भारतातील अनाथांसाठी एका संस्था उभी करणार असल्याचंही तिने खेदप यांना सांगितलं. रॉलँड मायकेल असं या महिलेने तिचं नाव सांगितलं. या दोघांनी व्हाट्सअॅपवरही भरपूर चर्चा केली.

विलियमसन नावाचा आपला एक मित्र अनाथांच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी भारतात येणार आहे अशी माहिती तिने खेदप यांना दिली. काही दिवसांनी विलियमसनने कर्मा खेदपशी संपर्क साधला. भारतात येण्यासाठी, क्लिअरंस आणि इतर खर्चांच्या नावाखाली त्याने खेदप यांच्याकडे २ कोटींची मागणी केली. खेदप यांनी २ कोटी रुपये विलियमसनच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. नंतर विलियमसन आणि रॉलँड मायकेलचे फोन लागणं बंद झाले. यामुळे आपली फसवणूक झाल्याचं खेदप यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेच कारवारच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!