Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांची प्रकृती बिघडल्याची बातमी अफवा, ते ठणठणीत असल्याचा खुलासा

Spread the love

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची व्हायरल झालेली बातमी अफवा असून . त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. हृदयाशी संबंधित आजाराने ते त्रस्त आहेत त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही प्रसारमाध्यमांनी मणिरत्नम यांना कार्डिअॅक अरेस्ट आल्याचा दावा केला आहे तर काहींनी हा दावा फेटाळला आहे. सध्या त्यांच्यावर चेन्नई येथील अपोलो रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मणिरत्नम यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ट्विटरवरू शेअर करण्यात आली होती मात्र रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले कि त्यांची प्रकृती ठणठणीत असून ते कामावर रुजूही झाले आहेत.

मणिरत्नम हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतलं एक मोठं नाव आहे. त्यांनी रोजा, बॉम्बे, दिल से, युवा, रावण, गुरू या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दिग्दर्शक, निर्माते, पटकथाकार मणिरत्नम म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्यासोबत एकदा तरी काम करता यावं अशी संधी कलाकार शोधत असतात. २००४ मध्ये युवा या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी मणिरत्नम यांना कार्डिअॅक अरेस्ट आला होता. त्यानंतर त्यांना हृदयाशी संबंधित त्रासाने ग्रासलं आहे. दोन दिवसांपूर्वीही त्यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हा त्यांना मुंबईतील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांना चेन्नई येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलं  अशी बातमी होती परंतु ते रुटीन चेकअप साठी रुग्णालयात आले होते , तपासण्या झाल्या आणि परत गेले त्यांना भरती करण्यात आलेले नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!