Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डॉक्टरांपाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये आता शिक्षकही उतरले रस्त्यावर

Spread the love

पश्चिम बंगालमध्ये आठवडाभरापासून डॉक्टरांचे आंदोलन सुरू असताना, आता येथील शिक्षक संघटना देखील आपल्या विविध मागण्यासांठी रस्त्यावर उतरल्या आहेत. शिक्षकांनी अन्य मागण्यांबरोबर वाढीव वेतनाची देखील मागणी केली आहे. तर, कोलकातामधील बिकाश भवन समोर आंदोलनासाठी उतरलेल्या शिक्षकांमध्ये व पोलिसांमध्ये वाद झाल्याने वातावरण तणावग्रस्त बनले आहे.

बंगालमदील एसएसके, एमएसके आणि एएस या शिक्षक संघटनांचे शिक्षक विविध मागण्यासांठी सोमवारी शिक्षण मंत्र्यांची भेट घेण्यास निघाले होते. दरम्यान पोलिसांनी त्यांना रस्त्यातच आडवल्याने परिस्थिती बिघडली यानंतर पोलिसांकडून शिक्षकांना पांगवण्यासाठी बळाचा वापर सुरू करण्यात आला. परिणामी आक्रमक शिक्षकांनी पोलिसांनी लावलेली बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न केल्याने, पोलिसांनी लाठीमार सुरू केला. यामुळे वातावरण अधिकच चिघळले असल्याचे दिसत आहे.

अगोदर डॉक्टरांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे हैराण असलेल्या मुख्यमंत्री ममता यांच्या समोर आता शिक्षक आंदोलनाच्या रूपाने नवे संकट उभे राहणार असल्याचे दिसत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!