Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आता असा विरोधी पक्ष नेता द्या कि जो भाजपात येणार नाही , तावडेंच्या विरोधकांना टोला

Spread the love

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस बंडखोर नेते आणि माजी विरोधी पक्षनेते यांनी राजीनामा देत भाजपा सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. या जागेवर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करावी अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीने केली आहे. त्यावरुन संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडेंनी विरोधकांना टोला लगावला आहे.

विनोद तावडे यांनी म्हटलं की, विरोधी पक्षांना जनतेने ठेंगा दिला आहे. विरोधी पक्षनेता कराल तो भाजपात येणार नाही याची काळजी घ्या. कारण या सरकारच्या कार्यकाळात जे विरोधी पक्षनेते झाले ते सरकारमध्ये आले असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला तर विजय वडेट्टीवार यांनीही तावडेंना उत्तर देत सत्ता आली तर तिकडे येईल, निष्ठा वारंवार बदलणार नाही. एकवेळ मी फसलो त्यामुळे मी निष्ठा बदलणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेते पद देण्यात यावं अशी विनंती काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे. त्यावर यथावकाश निर्णय जाहीर करण्याची विधानसभा अध्यक्षांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!