Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बँकेतील पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राहकांनी लक्षात ठेवावयात अशा ‘या’ टिप्स

Spread the love

बँकेतील पैशावर सायबर क्राईम करणारांची सतत नजर असून देशातली सर्वात मोठी बँक स्टेट बँक आॅफ इंडियाने  आपल्या ग्राहकांना फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही उपाय सांगितलेत. गेल्या ११ वर्षात एसबीआयमध्ये 23,734.74 कोटी रुपयांच्या 6,793 फसवणुकी समोर आल्यात. RBIच्या आकडेवारीनुसार बँकेत 50 हजाराहून जास्त फसवणुकीच्या तक्रारी नोंदवल्या गेल्यात. ज्यात 2.05 कोटी रुपयांची हेराफेरी झालीय. देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या बँक फसवणुकीच्या मामल्यात ग्राहकांना Sएसबीआयने  सावध केले आहे . कारण फ्राॅड फक्त आॅनलाइन ट्रान्झॅक्शननंच नाही, तर ATM द्वारेही होऊ शकतात असे आढळून आले आहे. त्यामुळे बँकेत पैसे ठेवून तुम्ही निवांत राहू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला काळजी घ्यायला हवी.

अशी घ्या काळजी 

तुमच्या डिव्हाइसमध्ये नियमित अँटिव्हायरस स्कॅन चालू ठेवा. ब्राउझरच्या अॅड्रेस बारमध्ये URL टाइप करा. पब्लिक डिव्हाइस, ओपन नेटवर्क आणि फ्री वायफाय वापरू नका. हे वापरलंत तर तुमची खासगी माहिती लीक होण्याची शक्यता आहे.

इंटरनेट बँकिंग पासवर्ड नेहमी बदलत राहा. तुमचं बँक खातं आणि नेट बँकिंग यांची माहिती फोनमध्ये सेव्ह करून ठेवू नका. नेहमी लाॅग इन डेट आणि वेळ तपासून पहात राहा.

तुम्ही तुमच्या फोनमध्ये बँक खात्याचा नंबर, एटीएम कार्ड, पासवर्ड या माहितीचे फोटो ठेवलेत तर माहिती सहज लीक होऊ शकते.

फसवणुकीपासून वाचण्यासाठी तुम्ही फिशिंग ईमेलवर कधी क्लिक करू नका. आॅनलाइन ट्रॅन्झॅक्शन करताना नेहमी वन टाइम पासवर्ड ( OTP ) निवडा. यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होते.

नेट बँकिंगचा पासवर्ड, ओटीपी, पिन, कार्ड व्हेरिफिकेशन कोड ( CCV ) आणि युपीआय पिन कुणाबरोबर शेअर करू नका. तुम्ही पासवर्ड विसरलात, तर स्मार्ट पद्धतीनं तो पुन्हा शोधा किंवा बदला.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!