Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राहुल गांधी कुठे आहेत ? विचारणा केली जात असतानाच दुपारनंतर राहुल गांधी संसदेत हजार झाले !!

Spread the love

नवनिर्वाचित संसदेच्या पहिल्या सत्राला आजपासून सुरुवात झाली. संसद सुरू झाल्यानंतर खासदारांच्या शपथविधीला सुरुवात झाली. सर्वात पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. विरोधी बाकावर सर्वाना उपस्थिती खटकली ती काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची. राहुल गांधी गेले कुठे असा प्रश्न भाजपकडून विचारण्यात येऊ लागला. राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही राहुल गांधी कुठे आहेत अशी जाहीर विचारणा सभागृहात केली होती .  त्यातच दुपारी शपथ घेणार असल्याचं राहुल यांनीच ट्विटकरून सांगितल्या चर्चा थोडी थंड झाली आणि दुपारी चारच्या सुमारास राहुल यांनी खासदारकीची शपथ घेतली.

आज सकाळीच भाजपच्या आय.टी.सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीबद्दल ट्विट केलं. १७ व्या लोकसभेचा आजचा पहिला दिवस आहे. राहुल गांधी कुठेच दिसत नाहीत. हीच लोकशाहीबद्दलची आस्था आहे का असं ट्विट करत त्यांनी राहुल यांच्यावर निशाना साधला.

दिल्लीत विविध बैठकांचं सत्र दिल्लीत सुरू असताना राहुल मात्र या बैठकांना उपस्थित नव्हते. आठवडाभरापूर्वी राहुल हे वायनाड या आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे तीन दिवसांमध्ये त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यानंतर ते लंडनला सुट्टीसाठी गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली होती . आठवडाभर लंडनमध्ये राहून सोमवारी १७ जूनला सकाळी ते दिल्लीत परतले. दिल्लीत आल्यानंतर दुपारी ते लोकसभेत पोहोचले आणि खासदारकीची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर राहुल गांधी स्वाक्षरी न करताच जात होते तेव्हा राजनाथ सिंग यांनी त्यांना स्वाक्षरी करायची आठवण करुन दिली. यावेळी पंतप्रधान मोदी उपस्थित नव्हते.

राहुल गांधींनी लोकसभेच्या प्रचारात प्रचंड मेहनत घेतली होती. त्यानंतर पराभवाची जबाबदारी घेत त्यांनी राजनामा देण्याची घोषणा करत नवा अध्यक्ष निवडावा असं ज्येष्ठ नेत्यांना  सांगितलं होतं. मात्र सर्वच नेत्यांनी त्यांचा राजीनामा फेटाळत त्यांनाच पदावर राहण्याचा आग्रह धरला. काँग्रेसला एका मोठ्या शस्त्रक्रियेची गरज असून राहुल गांधीच त्यासाठी योग्य आहेत असे  मत ज्येष्ठ नेते विरप्पा मोईली यांनी व्यक्त केले आहे . राहुल गांधी हे आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याने ते काँग्रेसच्या बैठकांना उपस्थित राहणार नाहीत अशी माहितीही सूत्रांनी दिलीय. त्यांच्या अनुपस्थित ज्येष्ठ नेते ऐ. के. अॅण्टनी हे अध्यक्षस्थानी असणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!