Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पक्ष, विपक्ष असा भेदभाव करण्यापेक्षा निष्पक्ष होऊन काम करा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Spread the love

पक्ष, विपक्ष असा भेदभाव करण्यापेक्षा निष्पक्ष होऊन काम करा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवनिर्वाचित खासदारांना दिला. पंतप्रधान मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिले संसदीय अधिवेशनआजपासून सुरू झाले. लोकसभा सभागृहात जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.विरोधकांची चिंता करू नका. लोकहिताचे मुद्दे मांडा. निष्पक्षपणे काम करा, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. विरोधकांशी आमचे वैर नाही. संख्येचा विचार न करता विरोधकांनी लोककल्याणकारी महत्त्वाचे मुद्दे मांडावेत. सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.

एखाद्या पक्षाला पुन्हा एकदा बहुमत मिळून सरकार स्थापन करण्याची संधी जनतेने दिली आहे. अनेक नवीन चेहरे संसदेत यावेळी दिसणार आहेत. नव्या सभासदांमुळे लोकसभेत नवा उत्साह संचारणार आहे. नवे विचार मांडले जाणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर मतदान झाले आहे. महिलांनीदेखील उत्स्फूर्तपणे निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवला. महिला खासदारांची वाढती संख्या पाहून आनंद होत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

दरम्यान, १७ व्या लोकसभा अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून, ५ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहेत. तीन तलाक विधेयकावरही नजर असणार असून, २६ जुलैपर्यंत अधिवेशन चालणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!