Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अमरावतीतमध्ये बसपा नेत्यांना लाथा – बुक्क्यांचा प्रसाद , निवडणुकीत पैसे घेतल्याचा आरोप

Spread the love

लोकसभा निवडणुकीत पैसे घेऊन भाजपला मतदान केल्याचा आरोप करत, कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. अमरावतीत हा प्रकार घडला. बसपाचे महाराष्ट्र प्रभारी संदीप ताजने यांच्यासह अन्य नेत्यांना कार्यकर्त्यांनी लाथा-बुक्क्यांसह खुर्च्या फेकून मारहाण केली. त्यांनी निवडणुकीत पैसे खाल्ल्याचा आरोप आहे.

बुहजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी संदीप ताजणे, राष्ट्रीय महासचिव सुरेश रैना, कृष्णा बेले प्रदेश महासचिव, प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार या नेत्यांना मारहाण करण्यात आली. अमरावती येथील शासकीय विश्रामगृहावर हा सर्व राडा झाला.

सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत बसपाच्या नगरसेवकांनी पैसे घेऊन भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांना मतदान केल्याचा आरोप आहे. याशिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही या नेत्यांनी पक्ष विकल्याचा आरोप सामान्य आरपीआय कार्यकर्त्यांचा आहे.

त्यामुळेच संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी विश्रामगृहावर बसप पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु होताच, त्यांच्यावर खुर्च्या फेकून, कपडे फाडून मारहाण केली. यातील काही नेते अक्षरशः पळून गेले. यावेळी ताजने हटाव बीएसपी बचाव अशी घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!