Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

World Cup २०१९ : रोहित शर्माचे दिमाखदार शतक

Spread the love

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा यानं पाकिस्तानविरुद्धच्या आजच्या सामन्यात ८५ चेंडूंमध्ये खणखणीत शतक झळकावलं आहे. यंदाच्या वर्ल्डकपमधील त्याचं हे दुसरं शतक आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्यात सामन्यात रोहितने नाबाद १२२ धावा काढल्या  होत्या. तर आजच्या सामन्यात त्याने १४० धावांची भागीदारी केली आणि बाद झाला. पाकिस्तानविरुद्धच्या आजच्या सामन्यात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल सलामीला आले होते. मात्र पाकिस्तानविरुद्ध खेळत असल्याचं कुठलंही दडपण न घेता त्यांनी दमदार भागीदारी केली.

दोघांनी पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची शतकी भागीदारी केली. दोघेही अतिशय सावध पण सातत्यपूर्ण खेळी खेळत होते. लोकेश राहुल ५७ धावांवर बाद झाला. या सलामी जोडीने एक विक्रमही केला. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदाच भारतीय सलामी जोडीने शतकी भागीदारी केली आहे. त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीला मैदानावर सेट होऊ देताना रोहितने आपला संयमी खेळ सुरूच ठेवला. तीन षटकार आणि ९ चौकारांसह ८५ चेंडूत रोहितने शतक पूर्ण केले. शेवटी १४० धावांवर तो बाद झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!