Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ३० जूनला ‘मन की बात’ : इंस्टाग्रामवर दिली माहिती

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला ‘मन की बात’ हा कार्यक्रम ३० जून रोजी प्रसारित होणार आहे. रेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमातून ते देशवासीयांना संबोधित करणार आहेत. ट्विटर, फेसबुक किंवा नमो अॅपवरून आगामी कार्यक्रमांची सूचना देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला ‘मन की बात’ हा कार्यक्रम ३० जून रोजी प्रसारित होणार आहे. रेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमातून ते देशवासीयांना संबोधित करणार आहेत. ट्विटर, फेसबुक किंवा नमो अॅपवरून आगामी कार्यक्रमांची सूचना देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी इन्स्टाग्रामवरून ‘मन की बात’ कार्यक्रमाची माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी ट्विटवरून या कार्यक्रमाची माहिती दिली होती. इन्स्टाग्रामवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली असून त्यात म्हटले आहे की, ३० जून रोजी सकाळी ११ वाजता आपण पुन्हा एकदा भेटूयात. रेडिओला धन्यवाद. १३० कोटी भारतीयांच्या भावना आणि सामूहिक सामर्थ्याची देवाण-घेवाण करूयात. मला विश्वास आहे की, आपणाकडेही खूप साऱ्या गोष्टी शेअर करण्यासाठी असतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. यासोबतच पंतप्रधान मोदींनी नमो अॅपवर आपल्या सूचना पाठवण्याचे आवाहन केले आहे.

या महिन्यातील ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी सूचना पाठवण्यासाठी १८००-११-७८०० या क्रमांकावर मेसेज रेकॉर्ड करण्यास सांगितले आहे . तसेच तुम्ही मला MyGov ओपन फोरमवर सुद्धा सूचना पाठवू शकता, असे म्हटले आहे. वेगवेगळे थीम आणि विचार शेअर करण्यास लोकांना आवाहन केल्याचे पंतप्रधानांनी आवाहन केले आहे, असे सूत्रांनी सांगितले. दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच ‘मन की बात’ कार्यक्रम प्रसारित होणार आहे. मोदींच्या पहिल्या कार्यकाळातील अखेरचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम २४ फेब्रुवारी रोजी प्रसारित करण्यात आला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!