Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ICC World Cup 2019 Live … : पाकची तर वाटच लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया !! भारत जिंकला !!

Spread the love

पाकची तर वाटच लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया

‘पाकिस्तानची तर खूप वाटच लावलीय अशा शब्दात सचिन ने आपली प्रतिक्रिया दिली आहे . र्ल्डकप स्पर्धेत भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आहे. भारतीय संघाने पाकविरुद्ध तीनशे धावांचा टप्पा ओलांडला होता, पण पावसाच्या आगमनामुळे सामना ४६ व्या षटकांवर थांबला होता. या दरम्यानच्या काळात सचिनने ही प्रतिक्रीया दिली होती.

Pakistan: Score
212/6 (40)
India : 336/5 (50)
Kedar Jadhav 9
V. Shankar 15
Virat Kohli  77 (Out)
MS Dhoni (out)
Hardik Pandya 22 (Out )
Rohit Sharma   136 (Out )
Lokesh Rahaul (Out)

पाकिस्तानने नाणेफेक जिंकली, भारत प्रथम फलंदाजी करणार

थोड्याच वेळात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सुरुवात 

असा आहे भारताचा अंतिम ११ जणांचा संघ

India’s playing XI against Pakistan: Rohit Sharma, KL Rahul, Virat Kohli (Captain), Vijay Shankar, Kedar Jadhav, MS Dhoni (W), Hardik Pandya, Bhuvneshwar Kumar, Kuldeep Yadav, Yuzvendra Chahal, Jasprit Bumrah.

असा आहे पाकिस्तानचा ११ जणांचा अंतिम संघ

Pakistan’s playing XI against India: Fakhar Zaman, Imam-ul-Haq, Babar Azam, Mohammad Hafeez, Sarfaraz Ahmed (Captain) (W), Shoaib Malik, Imad Wasim, Shadab Khan, Hassan Ali, Wahab Riaz, Mohammad Amir.

भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी ‘विराट’सेना रवाना

https://twitter.com/msdfansofficial/status/1140179186042036224

पाकिस्तान संघ ओल्ड ट्रॅफर्डवर दाखल

वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये ‘कांटे की टक्कर’ होत असून या लढतीवर पावसाचे सावट असल्याने सगळ्यांच्याच मनात धाकधूक आहे. मँचेस्टरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा पाऊस पडला. त्यानंतर काल शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि आजही ढगांची दाटी झालेली आहे. हवामान विभागाने आज येथे पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सामना होणार का ?, झाला तर किती षटकांचा होणार, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. दरम्यान आनंदाची बातमी अशी की खेळपट्टीवरील कव्हर्स हटवण्यात आले आहेत. त्यामुळे अवघ्या काही तासांत हा सामना सुरू होईल, अशी सध्या तरी शक्यता आहे.

इंग्लंडमधील लहरी हवामानाचा फटका वर्ल्डकपमधील अनेक सामन्यांना बसला आहे. आजच्या भारत-पाक सामन्यातही पाऊस व्हिलन ठरण्याचा धोका आहे. आज पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून पावसाच्या हलक्या तसेच जोरदार सरी येतील. तापमान जवळपास १७ अंश सेल्सियस राहील, असेही हवामान विभागाने नमूद केले आहे. त्यामुळे सामना रद्द होईल, अशी शक्यता नसून निश्चितच षटकं मात्र कमी होतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

शनिवारी मँचेस्टरमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सध्यातरी मैदानावरील खेळपट्टी झाकण्यात आलेली आहे. आज येथे हलक्या सरी आल्या पण नंतर पाऊस पूर्णपणे थांबल्याने येथे दाखल झालेले चाहते काहीसे सुखावले आहेत. दरम्यान, वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत ४ सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. यात भारताचाही न्यूझीलंडविरुद्धचा सामना आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!