It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

मातोश्रीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय झाली चर्चा ?

Advertisements
Spread the love

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी जावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी विस्तृतपणे चर्चा केली.

मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा वारंवार होत असते मात्र, तो योग काही जुळून येत नव्हता. आता मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यास पुष्टी देणारं ट्विट केलं आहे.

‘उद्धव ठाकरे यांची आज मातोश्री निवासस्थानी भेट घेतली व त्यांच्याशी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात विस्तृत चर्चा केली’, असे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार नेमका केव्हा होणार, याबाबत मुख्यमंत्र्यांनी गुप्तता राखली असली तरी पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच १६ जून रोजी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले जात आहे.

Leave a Reply