Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Hijack Jet Flight : जन्मठेपेची शिक्षा झालेले प्रकरण आहे तरी काय ?

Spread the love

अहमदाबादमधील  स्पेशल NIA कोर्टाने मंगळवारी मुंबईतील एका बिझनेसमनला प्लेन हायजॅकिंगची धमकी दिल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला ५ कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. बिरजू सल्ला असे दोषीचे नाव आहे. देशातील हे पहिलेच प्रकरण आहे. एंटी हायजॅकिंग अॅक्टनुसार जन्मठेपेच्या शिक्षेसह ५ कोटींच्या दंडाची शिक्षा झालेला बिरजू सल्ला हा देशातील  पहिला दोषी आहे. अखेर हे प्रकरण काय आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे .

प्रकरण असे आहे कि , बिरजू सल्ला ऑक्टोबर, २०१७ मध्ये जेट एअरवेजचे एक विमान हायजॅक करण्याची धमकी दिली होती. नंतर संबंधित विमानाचे इमरजन्सी लँडिंग करावे लागले होते. दोषी बिरजू सल्ला याने दंडाची रक्कम भरल्यानंतर ती रक्कम त्यावेळी विमानात असलेले क्रू मेंबर्स आणि प्रवाशांमध्ये वितरित करण्यात येईल, असे आदेश स्पेशल एनआयए कोर्टाने दिले आहेत.

दोषी बिझनेसम बिरजू सल्ला हा ३० ऑक्टोबर, २०१७ रोजी जेट एअरवेजच्या फ्लाइटने (9W339)मुंबईहून दिल्लीला जात होता. एअरक्राफ्टच्या टॉयलेटमधील टिश्यू पेपरच्या बॉक्सवर इंग्रजी आणि उर्दूत प्लेन हायजॅकिंगची धमकी दिली होती. प्लेन हायजॅक करून ते पाक व्याप्त काश्मीरमध्ये नेण्याबाबत सल्ला याने दिलेल्या धमकीत म्हटले होते. सल्लाने धमकीचे पत्र ‘अल्लाह-ओ-अकबर’ या शब्दांनी समाप्त केले होते. नंतर प्लेनमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. या धमकीनंतर अहमदाबाद एअरपोर्टवर इमरजन्सी लँडिंग करण्यात आले होते. त्यानंतर बिरजू सल्ला याला अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर सल्ला याला ‘नॅशनल नो फ्लाई लिस्ट’मध्ये टाकण्यात आले होते.

सल्लाने याला अटक केल्यानंतर चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला होता. गर्लफ्रेंडच्या ट्रान्सफरसाठी त्याने जेट एअरवेजला ही धमकी दिली होती. सल्ला याची गर्लफ्रेंड जेट एअरवेजमध्ये दिल्लीत नोकरी करत होती. या धमकीमुळे एअरवेज दिल्लीतील आपले ऑफिस बंद करेल आणि त्याची गर्लफ्रेंड मुंबईत परत येईल, असे सल्ला याने पोलिसांना सांगितले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!