उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या नंतर कर्नाटकमध्येही फेसबुक लाईव्ह करणाऱ्या दोघांना अटक

Spread the love

उत्तर प्रदेशच्या पाठोपाठ फेसबुक लाईव्हदरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धराजू आणि जौमराजू अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी हा व्हिडीओ फेसबुकवरुन हटवला आहे. दरम्यान कर्नाटकमधील विरोधी पक्ष अटकेच्या कारवाईचा निषेध करत आहेत.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दोघांनी २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकालआल्यानंतर फेसबुक लाईव्ह केलं होतं. या फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी, एचडी देवेगौडा आणि कुमारस्वामींचे पुत्र निखील यांच्यासाठी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली होती. यासोबत फेसबुक लाईव्ह व्डिहीओ डिलीट केला.

उत्तर प्रदेशातील अश्याच एका प्रकरणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी आणि व्हिडीओ शेअर केल्याने पत्रकार प्रशांत कनौजिया यांना अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणीदरम्यान प्रशांत कनौजिया यांना तात्काळ सोडण्याचा आदेश दिला आहे.

आपलं सरकार