Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ईव्हीएम वरून पवारांचे तळ्यात मळ्यात , त्यांचा रोष आता निवडणूक अधिकाऱ्यांवर !!

Spread the love

लोकसभा निवडणुकांचे निकाल लागण्याअगोदर आणि निकाल लागल्यानंतर देखील प्रचारापेक्षाही जास्त चर्चा होती ती ईव्हीएम घोटाळ्यांची. विरोधकांनी यावरून चांगलंच रान उठवलं होतं. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ईव्हीएमसंदर्भात केलेल्या वक्तव्याने चांगलीच राळ उडवून दिली होती. मात्र, आता ईव्हीएमची समस्या नसल्याचं मत शरद पवारांनी मांडलं आहे. ‘खरी अडचण ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटची नसून निवडणूक अधिकाऱ्यांनीच मतमोजणी करताना गडबड केली’, असा संशय शरद पवारांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या २०व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवारांनी ही भूमिका मांडली आहे. त्यामुळे त्यांच्या या नवीन भूमिकेमुळे नवी चर्चा आणि नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी ईव्हीएम घोटाळ्याविषयी आपलं मत मांडलं. ते म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकांमध्ये वापरलेल्या ईव्हीएमबद्दल आता काहीही शंका नाही. त्याबद्दल मी तज्ज्ञांशी बोललो आहे. दोन ठिकाणी त्यासंदर्भात आपण चौकशी केली केली. त्यामुळे खरी गडबड ही तिसऱ्या ठिकाणी म्हणजेच निवडणूक अधिकाऱ्याच्या पातळीवर झाली आहे. त्याबद्दल मी दिल्लीला जाऊन बैठक घेणार आहे’. दरम्यान, शरद पवारांच्या या भूमिकेमुळे आता राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!