श्रद्धा कपूर म्हातारी झाली !! कुठे ते पहाच…

Spread the love

तेलुगू निर्माता सुरेश बाबू ‘मिस ग्रॅनी’ या कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवणार आहे. या चित्रपटाच्या रिमेकमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरप्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच ‘मिस ग्रॅनी’चा तेलुगू रिमेकही बनवण्यात येणार असून, यात तेलुगू अभिनेत्री सामंथा अक्कीनेनी प्रमुख भूमिका साकारणार आहे.

Advertisements

‘मिस ग्रॅनी’ हा कोरियन चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या कथानकामध्ये ७४ वर्षीय वृद्ध महिला फोटो स्टुडिओमध्ये आपल्या आयुष्यातला शेवटचा फोटो काढण्यासाठी जाते. मात्र, फोटो काढल्यानंतर चमत्कार होतो आणि ती २० वर्षांची होते. त्यानंतर ती जीवनाचा नवा प्रवास सुरू करत संगीत क्षेत्रात कारकिर्द घडवते. तसेच, ती आपल्या नातवासोबत बॅंड सुरू करते. नातवाला आपण आपल्या आजीसोबत बँडचे काम करतो याची जराही माहिती नसते.

सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटाचा तेलुगू रिमेक नंदिनी रेड्डी बनवणार असून, सिनेमाचे नाव ‘ओह बेबी’ ठेवण्यात येणार आहे. लवकरच या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. श्रद्धा कपूर ही नितीश तिवारी यांच्या ‘छिछोरे’ सिनेमातही वृद्ध महिलेचे पात्र साकारताना दिसणार आहे. याआधी श्रद्धाने ‘हसीना पारकर’ या आपल्याहून अधिक वयाच्या स्त्रीची भूमिका साकारली होती. सध्या श्रद्धा अभिनेता प्रभासबरोबर ‘साहो’ आणि अभिनेता वरुण धवनबरोबर ‘स्ट्रीट डान्सर ३डी’मध्ये काम करत आहे.

आपलं सरकार