Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘ममतांनी कोणती साडी नेसावी, हे आता प्रशांत किशोर सांगतील?’ भाजपात नव्याने गेलेल्या नेत्याच्या विधानामुळे वादंग

Spread the love

भाजपचे नेते मुकुल रॉय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा वाढता प्रभाव पाहून ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबाधणी करायला सुरुवात केली आहे. ममता बॅनर्जी आता पुढील निवडणुकीसाठी प्रसिद्ध राजकीयतज्ज्ञ प्रशांत किशोर यांची मदत घेणार आहेत. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहेत. यातून भाजपचे नेते मुकुल रॉय यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘ममतांनी कोणती साडी नेसावी, हे आता प्रशांत किशोर सांगतील?’, असा वादग्रस्त सवाल त्यांनी केला आहे.

मुकुल रॉय हे याअगोदर तृणमूल काँग्रेसचे नेते होते. ते ममता बॅनर्जी यांच्या जवळचे नेते होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात अमित शहा थोडक्यात बचावले होते. परंतु, लोकसभा निकालात पश्चिम बंगालमध्ये भाजपचे वर्चस्व वाढताना दिसले. त्यामुळे ममता बॅनर्जी बिथरल्या आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला चांगले यश मिळावे आणि भाजप विरोधात लढण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी प्रशांत किशोर यांची मदत घेण्याचे ठरवले आहे. दरम्यान, ममता बॅनर्जींच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मुकुल रॉय यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘बंगालमध्ये आता ममता लाट नाही, त्यामुळे त्यांनी प्रशांत किशोर यांची मदत घेण्याचे ठरवले आहे. ममतांनी साडी कशी नेसावी आणि वेणी कशी घालावी याशिवाय हात कसा हलवावा, हे प्रशांत किशोर ठरवतील?’, असे मुकुल रॉय म्हणाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!