Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून विश्व हिंदू परिषदेनेही दिला राजकारण न करण्याचा सल्ला

Spread the love

राम मंदिर मुद्यावरून कोणत्याही प्रकारचे राजकारण करू नये, अशी सूचना विश्व हिंदू परिषदेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) समावेश असलेल्या शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा सोडवण्यासाठी एनडीएला धोरणात्मक मार्ग सूचवावा, असा सल्लाही विश्व हिंदू परिषदेने शिवसेनेला दिला आहे. यासंदर्भात बोलताना विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू सदाशिव कोकजे म्हणाले की, राम मंदिराच्या मुद्यावरून केल्या जाणाऱ्या राजकारणाशी विश्व हिंदू परिषदेचा संबंध नाही. मात्र, या मुद्यावरून कोणत्याही पक्षाने राजकारण करू नये, असे आमचे मत आहे. कारण राम मंदिर हा हिंदू समाजाच्या आस्थेचा विषय आहे, असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत बोलताना कोकजे म्हणाले की, अयोध्या वादाची सद्यपरिस्थिती पाहता शिवसेनेने केंद्र सरकारला वाद मिटवण्यासाठी धोरणात्मक सूचना देणे आवश्यक आहे. जेणेकरून राम मंदिराला घटनात्मक दर्जा प्राप्त होऊन भव्य राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा होईल. त्याचप्रमाणे राम मंदिर निर्माणासाठी शिवसेना कोणते प्रयत्न करत आहेत, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.  दरम्यान, उद्धव ठाकरे हे दहावेळा अयोध्येला गेले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरच राम मंदिराची निर्मिती होईल, अशी खिल्ली रिपाइं नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी उडवली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!