Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर मग हे वाचा , १ जुलैपासून होत आहे नवा बदल

Spread the love

तुम्ही जर ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे  ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एसबीआय  बँक १ जुलै पासून आपल्या नियमांमध्ये बदल करुन नवीन नियमांची घोषणा करणार आहे. या नवीन नियमांचा थेट एसबीआय च्या ४२ कोटी ग्राहकांवर परिणाम पडणार आहे.

एसबीआयकडून १ जूलैपासून रेपो रेटला जोडलेले गृह कर्ज ग्राहकांना ऑफर करण्यात येणार आहेत. यापुढे एसबीआयचा होम लोनचा व्याजदर पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटवर आधारित असेल. रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमध्ये बदल झाल्यास त्याचा थेट परिणाम एसबीआयच्या होम लोन व्याज दरावर होणार आहे. एसबीआयच्या व्याज दरात घट झाली, तर याचा फायदा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात होईल.

रिझर्व्ह बँक जेव्हा रेपो रेटमध्ये बदल करेल, तेव्हा SBI च्या होम लोनच्या व्याज दरात चढ – उतार होईल. कारण आता यापुढे एसबीआयबँक रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटनुसार आपल्या व्याज दारत चढ – उतार करणार आहे. एसबीआयच्या नव्या नियमांमुळे ४२ कोटी ग्राहाकांना व्याज दरात घट झाल्यास होम लोनसाठी सोयीस्कर पडू शकते.

गेल्या गुरुवारी रिझर्व्ह बँकेने सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची घट करत ५.७५ वर आणला होता. रिझर्व्ह बँकेने गेल्या ६ महिन्यात सलग तीन वेळा रेपो रेटमध्ये घट केली. डिसेंबर ते जून च्या दरम्यान रेपो रेटमध्ये एकूण ०.७५ टक्के घट केली. यामुळे भविष्यात एसबीआयचे होम लोनही कमी होऊ शकते. सध्या रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये काही बदल केले नसल्याने एसबीआय होम लोन स्थिर आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!