Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नितीन गडकरींच्या विरोधात बोलणाऱ्या भाजपच्या दोन नागपुरी नेत्यांना पक्षाने दिली अशीही शिक्षा !!

Spread the love

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींबद्दल अपशब्द वापरणे भाजपच्या दोन  नेत्यांना चांगलंच महागात पडलं आहे. लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींना काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागण्याची भविष्यवाणी या नेत्यांनी केली. शिवाय, नितीन गडकरींविरोधात अपशब्द देखील वापरले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यानचं हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यानंतर पक्षानं त्याची दखल घेत दोन्ही नेत्याचं सहा वर्षासाठी निलंबन केलं. दोन्ही नेते हे नागपुरातील भाजपचे नेते आहेत.

ज्या दोन नेत्यांचा ऑडिओ व्हायरल झाला त्यांचं नाव जयहरी सिंग ठाकूर आणि अभय तिडके असल्याचं हिंदुस्थान टाईम्सनं म्हटलं आहे. रिपोर्टनुसार दोन्ही नेते हे लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी पराभव होणार अशी भविष्यवाणी करत आहेत. त्यांनी नितीन गडकरींविरोधात अपशब्द देखील वापरले आहेत. लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा १, ९७००० मतांनी पराभव केला आहे. निलंबित करण्यात आलेले जयहरी सिंग ठाकूर नागपूर भाजपचे उपाध्यक्ष आहेत. तर, अभय तिडके हे पक्षाच्या एका समितीचे सदस्य आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी केलंल संभाषण व्हायरल झालं. त्यानंतर त्यांना पदावरून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!