Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

Spread the love

1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट; राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील जागा वाढवण्याची केली विनंती

2. औरंगाबाद: स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध कामे करण्यासाठी मास्टर सिस्टिम इंटिग्रेटरची (एमआयएस) १७८ कोटी रुपयांच्या विकास कामांच्या निविदा प्रक्रियेला अंतिम स्वरुप

3. संस्कृत आपल्या देशाची प्राचीन भाषा आहे. संस्कृतचा अन्य भाषांवरील प्रभाव पाहता संस्कृत अधिकृत भाषा होऊ शकते. यासाठी मनुष्यबळ विकास मंत्र्यांना विनंती करणार आहेः अनुसूचित जनजातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष नंद कुमार साय

4. अमेरिकेचे परराष्ट्र राज्यमंत्री माइक पॉम्पियो २६ जून रोजी भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; सूत्रांची माहिती

5. गुजरातमध्ये नवरात्रीच्या सुट्टींवर बंदी

6. मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार भेट; पाणी टंचाई, दुष्काळ, कर्जमाफी आदी विषयांवर करणार चर्चा

7. औरंगाबादः पैठण येथील जायकवाडी धरणात पोहायला गेलेल्या एका तरुणांचा बुडून मृत्यू

8. यवतमाळ : अंगावर वीज कोसळून पती-पत्नी ठार, कळंब तालुक्यतील गणेशवाडी येथील घटना.

9. पंजाबः शहर विकासमंत्री पदावरून नवज्योत सिंग सिद्धूंना डच्चू; ऊर्जा आणि नवीन आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा स्त्रोत मंत्री म्हणून नियुक्ती, मंत्रिमंडळात केले ४ बदल

10. मुंबईः बँक घोटाळ्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायद्यांतर्गत ईडीची १० ठिकाणी छापेमारी

11. मराठवाडा व विदर्भातील उष्णतेची लाट कायम. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक ४८.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद

12. दुबई येथील एका मालकाने ओडिशा येथील १० कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवल्याप्रकरणी केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लिहिले पत्र

13. जालनाः चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्यासाठी ट्रेनच्या डब्याला आग लागल्याची अफवा हुल्लडबाज प्रवाशांनी केल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्याची घटना

14. ऑपरेशन ब्लू स्टारच्या तपासाची मागणी करण्यासाठी शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल केंद्रीय गृहमंत्रालयात दाखल

15. औरंगाबाद: मुक्तेश्वर फाटा येथील वाळूजजवळ नागपूर-पुणे ट्रव्हल बस आज सकाळी साडेसहाच्या सुमारास उलटली; दोन ते चार प्रवासी जखमी

16. उत्तर प्रदेश: हरदोईतील सदरपूरजवळ ट्रक आणि ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भीषण अपघात, ६ जण ठार, ३० जण जखमी

17. चेन्नई – भाजपासोबत आमची युती कायम आहे, विनाकारण गैरसमज पसरवू नका, तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांचे स्पष्टीकरण

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!