Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Andhra Pradesh : जगमोहन धमाका , सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री !!

Spread the love

लोकसभा निवडणुकी दरम्यान आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसम पक्षाचा दणदणीत पराभव करून सत्तेवर आलेल्या जगमोहन सरकारनं सत्तास्थापनेचाही नवा पॅटर्न आणला आहे. आपल्या सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्रिपदं निर्माण करण्याचा निर्णय जगनमोहन यांनी घेत नवा धमाका केला आहे. एखाद्या राज्याच्या मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री असण्याचा देशाच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.

राज्य मंत्रिमंडळात सत्तासमतोल राखण्यासाठी  दोन उपमुख्यमंत्र्यांचा प्रयोग आजवर अनेक राज्यांनी केला आहे. आंध्र प्रदेशच्या आधीच्या सरकारमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी मागासवर्गीय व कप्पू समाजाला प्रतिनिधित्व म्हणून दोन उपमुख्यमंत्री नेमले होते. उत्तर प्रदेशातील योगी सरकारमध्येही काही काळ दोन उपमुख्यमंत्री होते. मात्र, जगनमोहन यांचा पाच उपमुख्यमंत्रिपदाचा प्रयोग पहिलाच ठरणार आहे.

आज झालेल्या वायएसआर काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत जगनमोहन यांनी ही घोषणा केली. त्यानुसार, जगनमोहन यांच्या मंत्रिमंडळात एएसी, एसटी, बीसी, अल्पसंख्याक आणि कप्पू समाजातील एका आमदाराला उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार आहे. जनतेच्या आशा-अपेक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं जगनमोहन यांनी सांगितलं. जगनमोहन सरकारचा शपथविधी शनिवारी होणार असून त्यांच्यासह २५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!