Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SSC Result 2019 Date : अफवांवर विश्वास ठेऊ नका, दहावीच्या निकालावर बोर्डाचं आवाहन

Spread the love

लवकरच दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करू, सोशल मीडियाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे. ७ जून रोजी दहावीचा निकाल लागणार असल्याच्या अफवा सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांत आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले.

मे महिन्याअखेरीस बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर दहावीचा निकाल आज जाहीर होणार, अशी अफवा पसरली होती. दहावीच्या निकालाबाबत फिरणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेऊ नका. तो मेसेज चुकीचा असून दहावीच्या निकालाची तारीख बोर्डाने अजून जाहीर केली नाही, असे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी सांगितलं.

दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागतो. हे लक्षात घेता सहा ते आठ जून दरम्यान निकाल लागू शकतो, असं म्हटलं जात आहे. यामुळे सोशल मीडियामध्ये निकाल जाहीर होण्याबाबत मेसेज व्हायरल होत होता. मात्र, बोर्डाकडून अद्याप कोणतही तारीख जाही करण्यात आली नाही. लवकरच ती तारीख जाहीर होणार आहे.

www.maharashtraeducation.com या संकेतस्थळावर दहावीचा निकाल पाहता येणार आहे.

मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर या नऊ विभागीय मंडळांतर्फे एक मार्च ते २२ मार्चदरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यभरातून १७ लाखांपेक्षा आधिक विद्यार्थी बसले होते. दहावीच्या निकालाच्या तारखांविषयी गेल्या आठवड्यापासून व्हॉट्सअॅपवर वेगवेगळे मेसेज फिरत होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, महाराष्ट्र बोर्डाकडून याबाबत अद्याप अधिकृतरित्या तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. लवकरच बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर होऊ शकते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!