Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Cyber Crime : सोशल मीडियावर आधी दोस्ती , मग प्रेमाचा ड्रामा , मग ब्लॅकमेल आणि शेवटी पोलीस कोठडी !!

Spread the love

सोशल नेटवर्किंग साईटवर ओळख झालेल्या तरुणीचे अश्लील फोटो पाठवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी २७ वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. संबंधित तरुण हा पेट्रोल पंपापर व्यवस्थापक म्हणून काम करायचा. मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पीडित तरुणीच्या वडिलांकडून लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न देखील केला होता.

२०१७ मध्ये दिल्लीत राहणाऱ्या तरुणीची सोशल नेटवर्किंग साईटवर २७ वर्षांच्या तरुणाशी ओळख झाली होती. यानंतर दोघांचे मोबाईलवरील संभाषणही वाढले. काही महिन्यांनी तो तरुणीला भेटण्यासाठी दिल्लीतही गेला होता. मात्र, त्यांच्यातील प्रेमसंबंध फार काळ टिकले नाही. तरुणीने त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध तोडले. यानंतर तरुणाने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. त्याने पीडित तरुणीच्या मित्रांना तिचे अश्लील फोटो पाठवले होते. हे फोटो नातेवाईकांनाही पाठवीन अशी धमकी तो पीडित तरुणीला द्यायचा.

१ जानेवारीरोजी त्याने पीडित तरुणीच्या वडिलांशी संपर्क साधला. तिचे वडील सरकारी अधिकारी आहेत. मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली होती. फोटो व्हायरल होऊ नये असे वाटत असेल तर ८ लाख रुपये द्यावेत, असे त्याने मुलीच्या वडिलांना सांगितले होते. यानंतर त्याचा मोबाईल फोन बंद होता. ‘तुमच्या मुलीवर मी साडे चार लाख रुपये खर्च केले’, असे त्याचे म्हणणे होते. या प्रकरणी २७ मे रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

अखेर पोलिसांनी तपासाला सुरुवात करत केरळमधील कोल्लम येथून आरोपीला अटक केली. आरोपीकड़ून पोलिसांनी दोन मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे. आरोपीने यापूर्वीही अनेक तरुणींना गंडा घातल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यात ब्राझीलच्या एका महिलेचा समावेश आहे. ‘आठ लाख रुपये मिळाले असते तर त्या पैशांमधून ब्राझीलला गेलो असतो’, असे त्याने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले.  आरोपी हा पदवीधर असून श्रीमंत व्यक्तींसारखे आयुष्य त्याला जगायचे होते, असे पोलिसांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!