Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारताचा इस्रायलशी ३०० कोटी रुपये किंमतीच्या स्पाइस बॉम्ब खरेदीचा करार

Spread the love

भारताने इस्रायलशी ३०० कोटी रुपये किंमतीच्या स्पाइस बॉम्ब खरेदीचा करार केला आहे. भारतीय हवाई दल इस्रायलकडून १०० SPICE बॉम्बची खरेदी करणार आहे. हे बॉम्ब भारताने बालाकोट येथे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात वापरले होते. स्पाइस बॉम्ब आपल्या भेदक क्षमतेसाठी विशेष ओळखले जातात. पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलानं पाकिस्तानातील बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या छुप्या तळांवर हवाई हल्ले केले होते. त्या हल्ल्यांसाठी हेच स्पाइस बॉम्ब वापरण्यात आले. हा बॉम्ब एका विशिष्ट जीपीएस गायडन्स किटसोबत लावला जातो. यामुळे बॉम्ब नेमकं लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरतात. या करारानुसार, येत्या तीन महिन्यात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात हे अद्ययावत स्पाइस बॉम्ब दाखल होणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!