Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

किन्नर विश्व : मुंबईत तृतीयपंथी मंजू चालवतेय ऑटो रिक्षा , सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट

Spread the love

मुंबईतील मंजू नावाच्या तृतीयपंथीनं सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पूनम खींची या तरूणीनं मंजूविषयीची माहिती फोटोसह फेसबुकवर पोस्ट केली. पूनमच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर रिक्षाचालक मंजूच्या नावानं चर्चा सुरू झाली आणि रातोरात तीनं सर्वांच लक्ष वेधलं. पूनमच्या त्या पोस्टमुळे तुमच्यांमध्ये एक नवी उम्मीद येईल. मंजूची कथा वाचून तुम्हाला दुख: झाल्याशिवाय राहणार नाही.

पूनम खींची यांनी आपल्या या पोस्ट मध्ये म्हटले आहे कि , या रिक्षा चालक तृतीयपंथीचं नाव मंजू आहे. मंजूची नखं लांबसडक असून त्याला लाल रंगाची नेल पॉलिश लावली होती. लांबसडक नखे पाहून पूनमनं मंजूला प्रश्न केला. ऐवढी लांबसडक नखे? त्यावर मंजू म्हणाली, ईदची तयारी करत आहे दिदी. त्यानंतर आमच्यामध्ये गप्पा रंगल्या. मंजूनं प्रियकरासोबत राहत असल्याचेही सांगितले. तिला याआधी कुठे नोकरी करत होतीस का विचारले असता ती म्हणाली. मी यापूर्वी एका हॉटेलमध्ये नोकरी करत होते. पण तृतीयपंथी असल्यामुळे मला नोकरीवरून काढलं. आमच्या दोघांमधील गप्पामधून मला एक गोष्ट समजली की, हिंसाक आणि धमकी देणाऱ्या वातावरणामध्ये आजही तृतीयपंथी समुदयानं आपलं आस्तित्व ठेवलं आहे. पाच वर्षांपासून मंजू रिक्षा चालवत आहे. रात्री ११ वाजेनंतरही मंजू रिक्षा चालवत नाही कारण काही लोक जाणूनबूजून तिला त्रास देतात. समाजाचे ठेकेदार समजणाऱ्या त्या सर्वांपेक्षा मंजूची ही कहानी वरचढ आहे आणि त्यांना ही एक चपराक आहे. अद्यापही काही लोक तृतीयपंथींना समाजाचा भाग मानत नाहीत. मंजू आपल्या जिवनात अनेक कठीण परिस्थितीला सामोरं गेली आहे. अनेक कठीण परिस्थितींमध्ये न खचता मुंबईच्या रस्त्यावर रिक्षा चालवत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!