Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

उत्तर प्रदेश : सपा-बसपा युतीला तूर्तास ब्रेक नाही, मायावतींचे ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह

Spread the love

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांन आज पत्रकार परिषद घेतली आहे. पत्रकार परिषद घेत मायावतींनी सपा-बसपा महागठबंधनसंदर्भात सूचक विधान केलं आहे. मायावती म्हणाल्या, यादव समाजानं सपाला सोडलं आहे. समाजवादी पार्टीत सुधारणांची गरज आहे. सपा-बसपा युतीला तूर्तास ब्रेक नाही पण लोकसभा निवडणुकीत यादवांचं मतदान सपाला मिळालेलं नाही. आम्ही उत्तर प्रदेशमधली निवडणूक स्वबळावर लढवणार आहोत परंतु अखिलेश यादव आणि आमचे सपासोबतचे संबंध संपलेले नाहीत.

मायावती यांनी ईव्हीएमवरही पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कौटुंबिक संबंध कधीही तुटणार नाहीत. आम्ही दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढलेलं केव्हाही चांगलं राहील. आम्ही एकट्यानंच येत्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला आहे. सपा-बसपा युतीला तूर्तास ब्रेक नाही. मायावती यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जर भविष्यात आम्हाला वाटलं की सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्याबरोबर राजकीय मतभेद दूर करण्यास यशस्वी झालो, तर आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करू. पण जर अखिलेशनी असं केलं नाही, तर आमची विधानसभा निवडणूक एकट्यानं लढण्याचा निर्णयच योग्य असेल, असंही मायावती म्हणाल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!