Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सलमानच्या ” भारत ” चा मार्ग मोकळा , हाय कोर्ट म्हणाले प्रसिद्धीसाठी याचिका , चित्रपटावर बंदी नाही …

Spread the love

बॉलिवूड स्टार सलमान खानची फिल्म  ” भारत ” वर बंदी लावण्यास सोमवारी दिल्ली हायकोर्टाने नकार दिला असून या याचिकेबाबत बोलताना न्यायाधीशांनी म्हटले आहे कि , याचिकाकर्त्याने प्रसिद्धीच्या झोतात , चर्चेत येण्यासाठी केलेला  हा एक स्टंट आहे .  हा चित्रपट उद्यापासून ईदच्या मोक्यावर रिलीज होत आहे . न्यायाधीशांनी मोबाईलवरच या चित्रपटाचा ट्रेलर बघितला.

न्यायमूर्ती  जे आर मिधा  आणि न्या. चंद्र शिकार यांनी याचिकाकर्त्याच्याच मोबाईलवर या सिनेमाचे ट्रेलर बघून विचारले कि यात आक्षेपार्ह काय आहे ? या न्यायाधीशांनी पुढे असेही म्हटले कि , अनेक लोकांची नावे भारत आहेत मग आम्ही त्याला आक्षेप घ्यावा कि कुणी एखाद्या भारत ने गुन्हा केला म्हणून सगळ्यांना तुरुंगात घालावे ?

याचिकाकर्त्याने आक्षेप घेताना म्हटले कि , या चित्रपटात सलमानखानचे  नाव ” भारत ” आहे . त्यावर न्यायाधीश म्हणाले कि , चित्रपट पाहण्याच्या आधीच पूर्वग्रह दूषित भावनेने हि याचिका दाखल केली आहे . न्यायालय पुढे असेही म्हणाले कि , माध्यमांना याचिकेबाबत माहिती देणे यातून हेच दिसते कि , प्रसिद्धीसाठी हा स्टंट करण्याचा हा एक प्रयत्न असू शकतो. याचिकाकर्त्याने हे समजून घ्यावे कि असे सगळे असतानाही न्यायालय याचिकाकर्ता  विकास त्यागीवर कुठलाही दंड लावत नाही .

अशाप्रकारे सादर याचिका न्यायालयाने निकालात काढली . हा सिनेमा उद्यापासून प्रदर्शित होत असल्याची घोषणा सलमान खान याने ट्विटर केली असून आपले तिकीट बुक करण्याचे आवाहन केले आहे . या चित्रपटात कॅटरिना,तब्बू , दिशा पटनी, सुनील ग्रोवर यांच्या भूमिका आहेत .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!