Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १० आमदार तर संपूर्ण काँग्रेस पक्षच आमच्या संपर्कात, वंचित बहुजन आघाडी  २८८ जागा लढविणार : प्रकाश आंबेडकर

Spread the love

आगामी विधासनभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कमीत कमी १० आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सर्व २८८ जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचेही आंबेडकर यांनी जाहीर केले. अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील औरंगाबाद लोकसभा मतदार संघात आपला सोशल इंजीनिअरिंगचा प्रयोग चालला. म्हणूनच इथे इम्तियाज जलील निवडून आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील अन्य मतदारसंघांमध्ये मात्र हा प्रयोग चालला नसल्याचेही ते म्हणाले.
संपूर्ण काँग्रेस पक्षच आमच्या संपर्कात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १० आमदार संपर्कात असल्याचे सांगितल्यानंतर काँग्रेसचे किती आमदार तुमच्या संपर्कात आहेत असा प्रश्न आंबेडकर यांना विचारण्यात आला. त्यावर राज्यातील संपूर्ण काँग्रेस पक्षच आमच्या संपर्कात असल्याचे आंबेडकर म्हणाले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी होईल का, असे विचारले असता या बाबत आताच काही सांगू शकत नसल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजू शेट्टी यांच्याशी प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा सुरू आहे. मात्र, राजू शेट्टी हे कुणासोबत जाणार ते त्यांनी लवकर ठरवावे असेही आंबेडकर म्हणाले. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांच्याबाबतबही भाष्य केले. आगामी विधानसभेत राज ठाकरे यांना चांगली संघी असल्याचे आंबेडकर म्हणाले. विधानसभेसाठी भाजप-शिवसेनेची युती असल्याने निर्माण होणारी पोकळी राज ठाकरे भरून काढू शकतील, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला. मात्र राज ठाकरे यांच्यासोबत आपली आघाडी होईल का  या प्रश्नावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!