Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चांद मुबारक : चंद्र दिसला उद्या देशभरात रमजान ईदची धूम

Spread the love

भारतात आज चंद्र दर्शन झाल्याने मुस्लिम बांधवांचा  पवित्र रमजान उद्या  बुधवारी होणार असल्याचे हिलाल सीरत कमिटीने जाहीर केले आहे. मध्यप्रदेशातील भोपाळसह देशातील विविध भागात चंद्रदर्शनझाल्याची माहिती कमिटीला मिळाल्याने समितीच्या झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. उद्या रमजान ईद साजरी होणार असल्याने देशभरातील मशिदींवर रोषणाई करण्यात आली आहे. मुंबई आणि मुंबईत हिलाल सीरत कमिटीची संध्याकाळी उशिरापर्यंत बैठक सुरू होती. यावेळी चंद्रदर्शन निश्चित झाल्याने संपूर्ण देशात रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ज्या दिवशी ईदचा चंद्र दिसतो तो रमजानचा शेवटचा दिवस समजला जातो. रमजान संपल्यानंतर ईद-उल-फितर साजरी केली जाते. रमजान हा मुस्लिम धर्मामध्ये  पवित्र सण मानला जातो. रमजानच्या कालावधीत मुस्लिम बांधव आपल्या कुटुंबियांची भेट घेऊन सणाच्या शुभेच्छा देतात. रमजानचा पवित्र महिना ३० दिवस चालतो. मात्र यावेळी ५ जून रोजीच रमजान ईद साजरी होणार असल्याने रमजानचा महिना केवळ २९ दिवसांचाच असेल. मागील वर्षी  १६ जून रोजी रमजान ईद साजरी करण्यात आली होती.

सहा मे पासून रमजान महिन्याच्या पवित्र सणाला सुरुवात झाली होती  तेव्हापासून शहरातील मशिदींमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर पहाटेची सहेरी झाल्यानंतर दिवसभर नमाज, कुराण पठण करण्यात आल्यानंतर सायंकाळी इफ्तारी केली जात होती. त्यामुळे दिवसभर कडकडीत उपवास ठेवल्यानंतर अल्लाहचे नामस्मरण करण्यात मुस्लिम बांधव  मग्न होते. मंगळवारी सायंकाळनंतर विविध ठिकाणी चंद्रदर्शन झाल्याची माहिती हिलाल सिरत कमिटीला देण्यात आली. काही ठिकाणी चंद्रदर्शन झाले नाही. त्याबाबत हिलाल सिरत कमिटीची सायंकाळनंतर बैठक झाली. त्या बैठकीत मौलाना फकरुद्दीन यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी रमजान ईद आज, बुधवारी साजरी करण्याचा निर्णय़ जाहीर कऱण्यात आला, असे सचिव राफीउद्दीन शेख यांनी सांगितले.
औरंगाबादच्या अल-हिलाल कमिटीनेही उद्या बुधवारी ईद उल फित्र सण साजरा केला जाणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. देशभरात विविध ठिकाणी चंद्रदर्शन झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अल हिलाल कमीटी अध्यक्ष मौलाना मोईजोद्दीन फारूखी यांनी दिली. भारतातच नव्हे तर पाकिस्तान, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि आशिया खंडातील इतर देशातही उद्या ५ जून रोजी रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. तर सौदी अरेबियात आजच रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!