Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

World cup 2019 : बांगलादेशची द.आफ्रिकेवर मात , २१ धावांनी विजय

Spread the love

आज वर्ल्डकप स्पर्धेच्या मालिकेत बांगलादेशने धक्कादायक निकालाची नोंद करीत  वनडे क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेला बांगलादेशने २१ धावांनी लोळवलं.
बांगलादेशच्या ३३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला ५० षटकांच्या अखेरीस ८ बाद ३०९ धावा करता आल्या. बांगलादेशकडून मुस्तफिझूर रेहमानने तीन गडी बाद केले, तर मोहम्मद सैफुद्दीनने दोघांना तंबूत धाडलं. उत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने वर्ल्डकप स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. बांगलादेशच्या ३३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना द.आफ्रिकने संथ गतीने सुरुवात केली. क्विंटन डी कॉकने ३२ चेंडूत २३ धावा केल्या, तर अॅडेन मार्करमने ५६ चेंडूत ४५ धावा केल्या. पहिले दोन विकेट पडल्यानंतर कर्णधार फॅप डू प्लेसिसने (६२) संघाला सावरलं होतं. पण बांगलादेशच्या मेहदी हसनने डू प्लेसिसला आपल्या फिरकी जाळ्यात ओढलं पण बांगलादेशच्या तगड्या आव्हानापुढे दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा दबावाखाली खेळताना दिसला. आवश्यक धावांच्या सरासरीचा आकडा वाढल्याने द.आफ्रिकेचे खेळाडू मोठे फटके मारण्याच्या नादात एकेक करत बाद होत गेले. अखेरीस बांगलादेशनं आफ्रिकेवर २१ धावांनी विजय प्राप्त केला.

सामन्याचा नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. बांगलादेशने संयमी सुरुवात केली होती. तमिम इक्बालने(१६) जम बसवण्याचा प्रयत्न केला. पण आफ्रिकेच्या अँडिलेने त्याला यष्टीरक्षक क्विंटन डिकॉक करवी झेलबाद केलं. त्यानंतर सौम्य सरकार आणि शाकिब अल हसनने संघाच्या धावसंख्येला आकार देण्यास सुरुवात केली. सौम्य सरकार ४२ धावांवर बाद झाला. पुढे मुशफिकुर रहीमने खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी करत पाया भक्कम केला. शाकीब आणि रहीम जोडीने आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शाकीबने ७५ तर मुशफिकुर रहीमने ७८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. अखेरच्या षटकात महमदुल्लाहने नाबाद ४६ धावांची खेळी साकारून संघाला तीनशेचा आकडा गाठून दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!