Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी , हि तर माध्यमातील चर्चा , याबाबतचा निर्णय प्रकाश आंबेडकर घेतील : पडळकर

Spread the love

‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करायची की नाही, याबाबतचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे घेणार आहेत. दोन्ही काँग्रेसमधील कोणीही संपर्क केलेला नाही. केवळ प्रसार माध्यमांतून काँग्रेसने घेतलेली भूमिका समजली आहे. काँग्रेसबरोबर जाण्याबाबत पक्षाची कोणतीही बैठक झालेली नाही. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी पक्ष संघटनेबाबत बैठक घेण्यात आली होती. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीकाँग्रेसने वंचित बहुजन आघाडीवर भाजपची “बी टीम ” अशी टीका केली होती. आता दोन्ही काँग्रेसने त्यांना वंचित आघाडी का हवी आहे, हे देखील स्पष्ट करावे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद  पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसआघाडीबरोबर जाण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने अद्याप घेतलेला नाही. वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर का यावे, हे दोन्ही काँग्रेसने अगोदर स्पष्ट करावे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी ही निर्णय घेईल,’  वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसबरोबर यावे, असे आवाहन काँग्रेसने केले आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीची भूमिका पडळकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. या वेळी शहराध्यक्ष अतुल बहुले उपस्थित होते.
‘लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद दिसून आली आहे. प्रत्येक उमेदवाराकडे किमान ४० हजार मते असल्याचे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून आघाडीकडे बघितले जाऊ लागले आहे. विविध पक्षांतील नेते हे आघाडीकडे येण्यास इच्छुक आहेत,’ असेही पडळकर म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत मी सांगलीमधून लढणार आहे. सांगलीतून आघाडीच्या किमान तीन जागा निवडून येऊ शकतील,’ असा दावाही त्यांनी केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!