Modi Sarkaar 2 : महाराष्ट्राच्या खासदारांना कोण कोणती खाती मिळाली ?

Spread the love

नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून सात जणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी चौघांच्या वाट्याला कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदं आली आहेत. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल व शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा समावेश आहे. तर, राज्यमंत्रिपदी खासदार रावसाहेब दानवे, रामदास आठवले व संजय धोत्रे यांची वर्णी लागली आहे.

Advertisements

मोदी सरकारमधील कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक अशी ओळख असलेले भाजप नेते नितीन गडकरी यांच्याकडील केंद्रीय भूपृष्ठ, रस्ते विकास व परिवहन खातं नव्या सरकारमध्येही कायम ठेवण्यात आलं आहे. तर, देशातील कोट्यवधी जनतेशी थेट संबंध असलेल्या रेल्वे खात्याचा कारभार महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेल्या पीयूष गोयल यांच्याकडं कायम ठेवण्यात आला आहे. मागील सरकारमध्ये मनुष्यबळ विकासमंत्री असलेल्या प्रकाश जावडेकर यांना यावेळी वन, पर्यावरण खात्यासह माहिती व प्रसारण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडं मागील सरकारमधीलअवजड उद्योग खातं कायम ठेवण्यात आलंय. याआधी हे खातं अनंत गीते यांच्याकडं होतं. आता ते शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्याकडं देण्यात आलं आहे.

रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांना सामाजिक न्याय, रावसाहेब दानवे यांना ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा तर, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना मनुष्यबळ विकास, माहिती व तंत्रज्ञान या खात्यांच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आपलं सरकार