Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

केंद्रीय गृहमंत्रीपद मिळाल्याबद्दल अभिनंदन !! आता आम्हा तरुणांना मारणार आहात काय ? हार्दिकने केला सवाल

Spread the love

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना केंद्रीय गृहमंत्रीपद मिळाल्याबद्दल काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मात्र शहांचं अभिनंदन केल्यानंतर भाजप भक्तांनी धमकीचे मेसेज पाठवल्याचा दावा करतानाच आता आम्हा तरुणांना मारणार आहात काय? असा सवाल हार्दिकने केला आहे.

‘गृहमंत्री झाल्याबद्दल अमित शहा यांचे अभिनंदन. मात्र, काही भक्त ‘हार्दिक, आता तुझे काय होणार?’ असा प्रश्न विचारणारे मेसेज मला पाठवीत आहेत. याचा अर्थ अमित शहा गृहमंत्री झाल्याबद्दल भक्त खूप खूष झाले आहेत. भाजपशी मुकाबला करणाऱ्या माझ्यासारख्या तरुणांच्या हत्या होणार आहेत का? शेवटी ईश्वरी इच्छाच अंतिम असते,’ असे ट्विट हार्दिकने केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात हार्दिक पटेलने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी काँग्रेसचा जोरकसपणे प्रचारही केला होता. मात्र, गुजरातमध्ये काँग्रेसला खातेही खोलता आले नव्हते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!