Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोदी सरकार २ : जम्बो मंत्रिमंडळ , २५ कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार असलेले ९ राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्री

Spread the love

मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली. सहा हजार निमंत्रितांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळ्यात  नरेंद्र मोदी यांनी आज सलग दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदींना पद व गोपनीयतेची शपथ दिली. मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात कोण असेल आणि कोण नाही याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती परंतु म्हणावा तसा जल्लोष आणि उत्साह लोकांमध्ये नव्हता. लोक आपापल्या दैनंदिन व्यवहारात मश्गुल होते. २०१४ मध्ये होता तसा जल्लोष मात्र बघावयास मिळाला नाही.

नव्या सरकारमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, सदानंद गौडा, निर्मला सीतारामन, रामविलास पासवान, नरेंद्रसिंह तोमर, रवीशंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल, थावरचंद गेहलोत, सुब्रमण्यम जयशंकर, डॉ. रमेश पोखरियाल निशांक, अर्जुन मुंडा, स्मृती इराणी, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, मुख्तार अब्बास नक्वी, प्रल्हाद जोशी, डॉ. महेंद्रनाथ पांडे, अरविंद सावंत यांच्यासह २५ कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. नव्या मोदी सरकारमध्ये स्वतंत्र प्रभार असलेले ९ राज्यमंत्री तर अन्य २४ राज्यमंत्री यांचा समावेश आहे.

कॅबिनेट मंत्री

१. नरेंद्र मोदी, पंतप्रधान
२. राजनाथ सिंह
३. अमित शहा
४. नितीन गडकरी
५. सदानंद गौडा
६. निर्मला सीतारामन
७. रामविलास पासवान
८. नरेंद्रसिंह तोमर
९. रविशंकर प्रसाद
१०. हरसिमरत कौर बादल
११. थावरचंद गेहलोत
१२. सुब्रमण्यम जयशंकर
१३. डॉ. रमेश पोखरियाल निशांक
१४. अर्जुन मुंडा
१५. स्मृती इराणी
१६. डॉ. हर्षवर्धन
१७. प्रकाश जावडेकर
१८. पीयूष गोयल
१९. धर्मेंद्र प्रधान
२०. मुख्तार अब्बास नक्वी
२१. प्रल्हाद जोशी
२२. डॉ. महेंद्रनाथ पांडे
२३. अरविंद सावंत (शिवसेना)
२४. गिरीराज सिंह
२५. गजेंद्रसिंह शेखावत

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

१. संतोषकुमार गंगवार
२. राव इंद्रजीत सिंह
३. श्रीपाद नाईक
४. डॉ. जितेंद्र सिंह
५. किरण रिजिजू
६. प्रल्हादसिंह पटेल
७. आर. के. सिंह
८. हरदीपसिंग पुरी
९. मनसुख मांडवीय

राज्यमंत्री

१. फग्गनसिंह कुलस्ते
२. अश्विनीकुमार चौबे
३. अर्जुन राम मेघवाल
४. जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंह
५. कृष्णपाल गुर्जर
६. रावसाहेब दानवे
७. किशन रेड्डी
८. पुरुषोत्तम रुपाला
९. रामदास आठवले
१०. साध्वी निरंजन ज्योती
११. बाबुल सुप्रियो
१२. डॉ. संजीवकुमार बलियान
१३. संजय धोत्रे
१४. अनुराग ठाकूर
१५. सुरेश अंगडी
१६. नित्यानंद राय
१७. रतनलाल कटारिया
१८. व्ही. मुरलीधरन
१९. रेणुकासिंह सरूता
२०. सोमप्रकाश
२१. रामेश्वर तेली
२२. प्रतापचंद्र सारंगी
२३. कैलाश चौधरी
२४. देवश्री चौधरी

आपलं सरकार

Click to listen highlighted text!