Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नव्या मंत्रिमंडळाच्या निवडीवरून खलबते , मोदींनी घेतली अरुण जेटलींनी भेट

Spread the love

१७ व्या लोकसभेत नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लावायची आणि कोणाची नाही यावरून विजयाचे शिलेदार स्वतः नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यात बठकांचे सत्र चालूच असून नव्या मंत्रिमंडळात काम कर्म्याची इच्छा नाही असे जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुण जेटली यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली व सत्तास्थापनेच्या अनुशंगाने जेटलींसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. जेटली यांनी नव्या मंत्रिमंडळात आपणास कोणतीही जबाबदारी देवू नये, अशी विनंती मोदींना पत्र पाठवून केली आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती मोदींनी जेटलींना यावेळी केल्याचे वृत्तही काही वाहिन्यांनी दिले आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं असून उद्या सायंकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्रिमंडळाची रूपरेखा ठरवण्यासाठी भाजप नेतृत्वाच्या बैठकांची मालिका सुरू आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यात मॅरेथॉन बैठक झाली. मोदींनी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. त्यानंतर रात्री ९ वाजताच्या सुमारास मोदींचा ताफा जेटली यांच्या निवासस्थानी दाखल झाला. जेटली यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत मंत्रिपदाची जबाबदारी नको, अशी विनंती मोदींना केली आहे. त्यामुळे ही भेट महत्त्वाची ठरली.
मोदी आणि जेटली यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेचा अधिकृत तपशील मिळालेला नसला तरी जेटलींनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती मोदींनी केल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!