Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शपथविधीचे अधिकृत निमंत्रणही नसलेले रामदास आठवले स्वतःच्या मंत्रिपदाबद्दल काय म्हणतात पहा …

Spread the love

मला अमित शाह यांचा फोन आलेला नाही, पण तो येईल अशी खात्री आहे. अपेक्षा आहे.कारण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली NDA चे सरकार आले पाहिजे, दलित आणि अल्पसंख्याकांची मते मिळाली पाहिजेत यासाठी महाराष्ट्रात आणि देशात मी प्रयत्न केला होता. मला दिलेल्या खात्याची जबाबदारी मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे. प्रचारात आघाडीवर राहिलो होतो. त्यामुळे मला मंत्रिपदाची अपेक्षा आहे, बाबासाहेब आणि नेहरूंच्या मंत्रिमंडळानंतर मोदींनी  मला संधी दिली असं रामदास यांचं म्हणणं आहे .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता देशभरात आहे. गुरुवारी म्हणजेच उद्या मोदींचा शपथविधी होत आहे. मात्र रिपाई नेते रामदास आठवले यांना अद्याप भाजपकडून अद्याप फोन किंवा आमंत्रणच आलेलं नाही. स्वत: रामदास आठवले यांनीच ही माहिती टीव्ही 9 मराठीला दिली असल्याचे वृत्त आहे.

या वृत्तात पुढे म्हटले आहे कि, मिळेल ती जबाबदारी आठवले स्वीकारणार आहेत . टीव्ही ९ शी बोलताना आठवले पुढे म्हणाले कि , कॅबिनेट असेल, स्वतंत्र प्रभार असेल किंवा राज्यमंत्री पद ते मी आता सांगू शकत नाही. माझ्या कामाचा विचार करून मोदी मला न्याय देतील अशी अपेक्षा आहे. बाबासाहेब आणि नेहरूंच्या मंत्रिमंडळानंतर मोदींनी संधी दिली, बाबाहेबांचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची माझी तयारी आहे, असं रामदास आठवले म्हणाले.

माझी मुख्यमंत्री आणि गडकरी यांच्याशी चर्चा झाली आहे. खात्याबद्दल चर्चा नाही, पण मंत्रिमंडळात घ्यावे असे त्यांना सांगितले आहे. नरेंद्र मोदी सर्व अँगलने विचार करीत आहेत. युवकांना संधी मिळाली पाहिजे. युवक NDA च्या , भाजपच्या बाजूने आहेत, असं रामदास आठवले यांनी सांगितलं. भाजपकडून संपर्क झालेला नाही, पण तो होईल. माझं नाव नक्की मंत्रिमंडळ यादीत असेल, उद्या माझा शपथविधी होईल याची मला खात्री आहे, असं रामदास आठवलेंनी नमूद केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!