Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डॉ . पायल तडवी मृत्यू प्रकरण : तीनही फरार आरोपी महिला डॉक्टरांना पोलिसांनी कसे आणि कुठे पकडले ?

Spread the love

डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्येप्रकरणी नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील  डॉ. भक्ती मेहरपाठोपाठ डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या दोन्ही फरार महिला डॉक्टरना पकडण्यात पोलिसांना कसे यश आले ? पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अंकिता हिचा तर परदेशात पळून जाण्याचा इरादा होता. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. पायल तडवी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होताच भक्ती, हेमा आणि अंकिता या तिघी गायब झाल्या. त्यानंतर त्यांनी मोबाइलही बंद केले. त्यांचे शेवटचे लोकेशन नायर रुग्णालय दाखवत होते. अजामीनपात्र कलमे लावूनही त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिताच्या नातेवाईकांनी तिचे विमान तिकीटही बुक केले होते. मात्र जामीन अर्जावर सुनावणी होण्यापूर्वीच आणि परदेशात पळण्यापूर्वी हिंजवडी येथील एका नातेवाईकाच्या घरात लपलेल्या अंकिताला पोलिसांनी शोधून काढले.

पोलिसांची शोधमोहीम सुरू असतानाच तिघींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. यासाठीच फोर्ट येथे न्यायालय परिसरात आलेल्या भक्ती हिला मंगळवारी अटक करण्यात आली. भक्ती तावडीत सापडताच हेमा आणि अंकिता यांचा ठावठिकाणा पोलिसांना समजला. त्यानुसार अंधेरी येथील एका हॉटेलमधून मंगळवारी रात्री हेमा आणि त्यानंतर बुधवारी पहाटे पुणे हिंजवडी परिसरातून अंकिता हिला अटक करण्यात आली. दुपारी तिघींना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांचे म्हणणे आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एम. सदरानी यांनी तिघींना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!