Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ताजी बातमी : ठरले !! असे असेल नरेंद्र मोदी यांचे मंत्री मंडळ ,कोण कोण असतील नव्या मंत्री मंडळात बघा तर खरं

Spread the love

आज होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीमध्ये २५ खासदार कॅबनेट आणि राज्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करणार असल्याची माहिती महानायक ऑनलाईनला मिळाली आहे. तसे फोन संबंधित खासदारांना गेले आहेत. या मध्ये, पीयूष गोयल, रामदास आठवले, रामविलास पासवान, कृष्ण मोहन रेड्डी यांचा मुख्यत्वेकरून यांचा समावेश आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
आज सायंकाळी नरेंद्र मोदी यांच्या समवेत पुढील खासदार मंत्री पदाची शपथ घेतली.
अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यासोबतपुढीलमंत्रीशपथघेणारआहेत.

१. जितेंद्र सिंग

२. रामदास आठवले

३. रामविलास पासवान

४. पियुष गोयल

५. किशन रेड्डी

६. अर्जुनराम मेघवाल

७. सुरेश अंगडी

८. प्रल्हाद जोशी

९. मुख्तार अब्बासनक्वी

१०. प्रल्हादपटेल

११. प्रकाश जावडेकर

१२. रविशंकर प्रसाद

१३. बाबुल सुप्रियो

१४. निर्मला सीतारामन

१५. स्मृती इराणी

१६. सदानंद गौडा

१७. कैलास चौधरी

१८. नितीन गडकरी

१९. भंवरचंद गहलोत

२०. किशन पलगुजार

२१. किरण रिजूजू

२२. साध्वी निरंजन ज्योती

२३. मनसुखलाल मांडवीय

२४. हरसिमरत कौरबादल

या मंत्री मंडळात राजनाथसिंह यांची जबाबदारी गृहमंत्री पदाचीच राहणार असून नव्याने मंत्रिमंडळात समावेश होणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांच्या कडे अर्थखाते जाण्याची शक्यताआहे तर पियुष गोयल यांना रेल्वे किंवा संरक्षण मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे. सुरेश प्रभू यांना वाणिज्य मंत्रालय, नितीन गडकरी यांना वाहतूक आणि रेल्वे मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे. अनुप्रिया पटेल यांना कॅबिनेट मिळण्याची शक्यता आहे. रविशंकर प्रसाद यांच्याकडे कायदा किंवा दूरसंचार मंत्रालय मिळेल . निर्मला सीतारामन यांना विदेश व्यवहार मंत्रालय तर सदानंद गौडा यांना कायदा मंत्रिपद मिळू शकते . स्मृती इराणी यांचे खाते मात्र अद्याप समजू शकले नाही . या शिवाय शिवसेनेला दोनमंत्री पदे देण्याचे निश्चित झाले असून जेडीयू यांना दोन, तर अलायन्समधील खासदारांनाही मंत्रीपदे देण्याचे नक्की झाले आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!