Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शहिदांना अभिवादन करून राजघाटावर गांधी आणि अटल बिहारी यांच्या समाधी स्थळाचे मोदींनी घेतले दर्शन

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ७ वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी, मोदी यांनी राजघाट येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळी वायपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली. याबरोबरच मोदींनी राष्ट्रीय युद्ध स्मारकात देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहिदांनाही श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत भाजप अध्यक्ष अमित शहा, जेपी नड्डा, पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, गिरिराज सिंग आदीनेते होते.

बापू आणि वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकाकडे गेले. पंतप्रधान मोदी यांनी याच वर्षी २६ फेब्रुवारी या दिवशी युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले होते. या वेळी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व विजय संपादन केला. नरेंद्र मोदी हे गेल्या ५० वर्षांच्या कालखंडात सलग दुसऱ्यांदा पूर्ण बहुमत मिळवणारे पंतप्रधान ठरले आहेत. आज संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!