Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोदींच्या शपथविधीसाठी ६००० लोकांच्या पाहुणचाराची जय्यत तयारी

Spread the love

राष्ट्रपती भवनात अत्यंत साध्या पण देखण्या समारंभात आज रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी समारंभ पार पडणार आहे. या कार्यक्रमाला १४ राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार असून तब्बल ६००० पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात येणार आहे.

राष्ट्रपती भवनासमोरील पटांगणात हा समारंभ पार पडणार आहे. हा कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने पार पडावा अशी इच्छा खु्द्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. शपथविधी नंतर आलेल्या पाहुण्यांसाठी शाही भोजनाचे आयोजन करण्यात आलं आहे. या भोजनात दाल रायसिना सारख्या भारतीय पदार्थांसोबत विदेशी मांसाहारी पदार्थांचाही समावेश करण्यात आला आहे. पूर्व आशियातील देशांचे अनेक राष्ट्रप्रमुख या कार्यक्रमात सहभागी होणार असल्यामुळे अनेक ईस्ट आशियन मांसाहारी पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. सात वाजताच्या शपथविधीसाठी दुपारी ४च्या रणरणत्या उन्हातच पाहुणे येण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे पाहुण्यांना पाण्याच्या बॉटल्सही देण्यात येणार आहेत.

गुरुवारी संध्याकाळी पार पडणाऱ्या या समारंभासाठी मंगळवारी संध्याकाळपासूनच राष्ट्रपती भवनात तयारीला सुरुवात झाली आहे. ६००० लोकांसाठी मेजवानी तयार करण्यासाठी दोन दिवस लागणार आहेत. या ६००० पाहुण्यांमध्ये भारतातील अनेक पक्षांचे नेते, इतर देशांचे राजदूत, राष्ट्रप्रमुख आणि विचारवंताचा समावेश आहे. कार्यक्रमाची रुपरेषा २०१४ सारखीच असणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!