Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पायल तडवी मृत्यू प्रकरण : तिन्हीही डॉक्टर महिला आरोपी अटकेत

Spread the love

नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्ये प्रकरणातील तीन फरार महिला डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. तब्बल सहा दिवसांनंतर त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या तिघींनाही आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

अटक केलेल्यांमध्ये डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल यांचा समावेश आहे. यातील आहुजा व खंडेलवाल हिनं अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र गुन्ह्यांमध्ये अजामीनपात्र कलमे लावण्यात आल्याने त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला आहे.

डॉ. पायल तडवी यांच्या कथित आत्महत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात उमटत आहेत. पाच दिवस उलटले तरी आरोपी सापडत नसल्याने पायलच्या कुटुंबीयांसह विविध पक्ष आणि संस्थांच्या प्रतिनिधींनी नायर रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. याच दरम्यान अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पोलिसांच्या शोधकार्याला मंगळवारी यश आले. या तिघींपैकी डॉ. भक्ती मेहर ही अटकपूर्व जामिनासाठी मंगळवारी फोर्ट परिसरातील महानगर दंडाधिकारी न्यायालयात येणार असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी या परिसरात सापळा रचून तिला पकडले.

डॉ. हेमा अहुजा हिला रात्री अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातून अटक करण्यात आली. आग्रीपाडा पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली. महिला असल्यानं न्यायाधीशांची विशेष परवानगी घेऊन हेमाला रात्री अटक करण्यात आली. खंडेलवाल हिलाही रात्री अटक करण्यात आली. हेमा आणि अंकिताला पहाटे तीन वाजता जे जे रुग्णालयात वैद्यकीत तपासणीसाठी नेण्यात आलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!