Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ईटी मनीवर पाहा मोफत तुमचा क्रेडिट स्कोअर

Spread the love

आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीसाठी उपयुक्त असणारे देशातील सर्वात मोठे अॅप ‘ईटी मनी’वर आता ग्राहकांना त्यांचा क्रेडिट स्कोअर मोफत पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या क्रेडिटचे प्रगतीपुस्तकही मोफत मिळणार आहे. क्रेडिट कार्डच्या एकूण हिशेब ,गुंतवणूक, व्याज ,कर्ज यासर्व गोष्टींच्या आधारे प्रत्येक ग्राहकाचा तीन आकडी क्रेडिट स्कोअर निश्चित करण्यात येतो. ४० लाखांहून अधिक युजर्स असणाऱ्या ईटी मनीने ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. देशातील सर्व बँका कर्ज देताना, क्रेडिट कार्डची लिमीट वाढवताना ,गुंतवणूक करताना हा क्रेडिट स्कोअर विचारत घेत असतात. क्रेडिट स्कोअरसोबतच क्रेडिट कार्डचे प्रगतीपुस्तकही ग्राहकांना पाहता येणार आहे. यामध्ये किती खर्च झाला, नफा किती झाला, व्याज किती मिळाले ईत्यादी सर्व माहिती उपलब्ध असेल.

आपला क्रेडिट स्कोअर पाहण्यासाठी ग्राहकांना दहा आकडी मोबाइल क्रमांक आणि संपूर्ण नाव एन्टर करावं लागणार आहे. क्रेडिट स्कोअर सोबत तो वाढवण्यासाठी काय करण्यात यावं याचा सल्ला आणि टिप्सही देण्यात येतील.

‘क्रेडिट स्कोअर हा भविष्यातील गुंतवणुकीसाठी आणि कर्जांच्या दृष्टीने ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जर ग्राहकांना त्यांचा स्कोअर कळला, तो वाढवण्यासाठी काय करावे याच्या टिप्स मिळाल्या तर निश्चितच त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास प्रचंड हातभार लागेल. यासाठी क्रेडिटची माहिती देणाऱ्या , त्यासंदर्भात योग्य टिप्स देणाऱ्या ‘एक्सपिरीयन’ या कंपनीशी आम्ही करार केला आहे.’ अशी माहिती ईटी मनीचे बिझनेस हेड मानव सेठ यांनी दिली आहे. दरम्यान ईटी मनीचे क्रेडिट स्कोअर कधीही आणि कोणत्याहीवेळी ग्राहकांना पाहता येतील. तसंच क्रेडिट संदर्भातल्या टिप्स त्यांचे क्रेडिट स्कोअर वाढवण्यास आणि परिणामी आर्थिक परिस्थिती सुधारण्यास निश्चित मदत करतील असं एक्सपिरीयन क्रेडिट इन्फो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आशिष सिंघल यांनी दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!