डॉ . पायल आत्महत्या प्रकरण : चौकशी समितीच्या अहवालानंतर “त्या ” तिघींसह विभाग प्रमुखही निलंबित

Advertisements
Advertisements
Spread the love

नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील रँगिगच्याा छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी हिने केलेल्या आत्महत्या प्रकरणात सोमवारी चार डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. डॉ. पायल हिला त्रास दिल्याबद्दल तसेच, जातीवाचक अपशब्दांनी तिची हेटाळणी केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. यी चिंग लिंग यांच्यासह वरिष्ठ निवासी डॉक्टर हेमा आहुजा, डॉ. भक्ती महिरे, डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्यावर ही कारवाई झाली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी नायर महाविद्यालयातील सहा जणांची समिती नेमण्यात आली होती. समितीने सर्व बाजूंनी चौकशी करून दिलेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisements

महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तात हि माहिती देण्यात आली आहे . या वृत्तात म्हटले आहे कि , नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील रँगिगच्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी हिने केलेल्या आत्महत्या प्रकरणात सोमवारी चार डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मिळालेल्या अहवालाच्या आधारे पहिल्या टप्प्यात ही कारवाई करण्यात आली आहे. विस्तृत अहवाल येताच पुढील कारवाई करण्यात येईल, असे पालिकेचे आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील धामणे यांनी स्पष्ट केले.

Advertisements
Advertisements

यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी त्यास दुजोरा दिला. डॉ. तडवी कुटुंबीयांची भेट घेऊन यासंदर्भात अधिक विचारणा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. अॅन्टीरॅगिंग समितीने दिलेल्या अहवालातील बाबींवर गांभीर्याने विचार करण्यात येणार आहे. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी तडवी कुटुंबीयांनी केली आहे. मात्र, डॉ. भारमल यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याची शक्यता दिसत नसल्याचे पालिकेतील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

महिला आयोगाची नोटीस
या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाने नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला दिले आहेत. एखाद्या तरुण महिला डॉक्टरला अशा प्रकारे रँगिगमुळे आत्महत्या करावी लागणे हे दुर्दैवी आहे, असे आयोगाच्या अध्यक्ष डॉ. विजया रहाटकर यांनी स्पष्ट केले.

आपलं सरकार