Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे कारस्थान : जाणून घ्या काय झाले न्यायालयात ?

Spread the love

टेलिव्हिजन चॅनलवर बसून मोठ्या मोठ्या गप्पा मारणारे आणि त्यांची वकिली करणारे सनातन प्रभातचे वकील संजीव पुनाळेकर  आणि विक्रम भावे यांच्या विरोधात भक्कम पुरावे असल्याने त्यांना उचलल्याची माहिती सीबीआय ने डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात न्यायालयाला दिली आहे . या संदर्भात सीबीआय चे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यानी  दिलेल्या माहितीनुसार विक्रम भावे याने या प्रकरणात रेकी केली आणि आणि पुनाळकरने  गुन्ह्यातील हत्यारांची विल्हेवाट लावण्यास मदत केलीआहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास गतीने सुरु नसला तरी, आता या तपासाने वेग घेतल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणात सीबीआयने मुंबई येथून अटक केलेल्या विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी सरकारी वकिलांनी ही माहिती दिली. दरम्यान, न्यायालयाने पुनाळेकर आणि भावे या दोघांनाही १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. या वेळी विरेंद्र इचलकरंजीकर यांनी बचाव पक्षाचे वकील म्हणून काम पाहिले.

नरेंद्र दाभोळकर यांची हत्या २०१३  मध्ये पुण्यात सकाळीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सीबीआयकडून सचिन अंदुरे आणि हिंदू जनगागृती समितीचे सदस्य वीरेंद्र तावडे यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती.

प्राप्त माहितीनुसार  सीबीआयचे विशेष सरकारी वकील, प्रकाश सूर्यवंशी यांनी युक्तीवाद करताना म्हटले की, डॉ. दाभोलकर यांची हत्या, त्यांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांनी वापरलेली मोटरसायकल या मुद्द्यांवर विक्रम भावे याची चौकशी होणे आवश्यक आहे. तर, संजीव  पुनाळेकर याने डॉ. दाभोलकर आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात वापरलेले पिस्तूल नष्ट करण्यासाठी मदत केली आहे. हा एक व्यापक कट असून हा कट उघडकीस आणण्यासाठी या दोघांची (भावे आणि पुनाळेकर) चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे. सीबीआय विशेष वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यावर न्यायालयाने भावे आणि पुनाळेकर या दोघांनाही सीबीआय कोठडी सुनावली. न्यायाधीश एस. एम. सोनवणे यांनी हे आदेश दिले. ही कोठडी १ जूनपर्यंत असणार आहे.

दरम्यान, आरोपी संजीव पुनाळेकर यांनीही न्यायालयात युक्तिवाद केला. या वेळी पुनाळेकर म्हणाले, मी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींच्या वतीने खटला लढत आहे. या प्रकरणात मी वकील आहे. तसेच, शरद कळसकर याने कर्नाटक पोलिसांना दिलेल्या जबाबाच्या अधारे मला अटक करण्यात आली आहे. केवळ आरोपींचा वकील आहे म्हणून माझ्यावर आणि माझ्या सोबत काम करतो म्हणून विक्रम भावे यांच्यावर कारवाई करणे चुकीचे आहे. अशा पद्धतीने कारवाई करणे योग्य होणार नसल्याचा युक्तीवादही आरोपी पुनाळेकर यांनी स्वत: केला. परंतु न्यायालयाने सीबीआय वकिलांचे म्हणणे ग्राह्य धरीत या दोघांनाही सीबीआय कोठडी सुनावली. दरम्यान, विक्रम भावे आणि संजिव पुनाळेकर यांच्या अटकेमुळे डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागले आयबीएन लोकमत चॅनलमध्ये असताना दाभोलकर प्रकरणात मोठ्या गप्पा मारणारे हेच ते पुनाळकर आहेत. संजीव पुनाळेकर हा विविध गुन्ह्याच्या प्रकरणी वकील म्हणून काम करतो. तसेच दाभोळकर हत्येप्रकरणीसुद्धा पुनाळेकर हा वकील म्हणून काम करत होता. तर विक्रम भावे याला ठाण्यातील गडकरी रंगायतन बॉम्ब स्फोट प्रकरणी अटक करण्यात आली होती. तर आता यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली असता या दोघांची नावे समोर आली आहेत. दाभोळकर हत्येप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करणे असा आरोप पुनाळेकर याच्यावर आहे. तर भावे याच्यावर दाभोळकर याने आरोपींना त्यांची ओळख करुन देणे, घटनास्थळाची रेकी करणे असे आरोप लावण्यात आले आहे. या दोघांची नावे शरद कळसकर याच्या जबाबानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!