News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

Spread the love

1. मुंबई: नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना मुंबईतून अटक, सीबीआयची कारवाई

Advertisements

2. शपथविधी सोहळ्याची तारीख अद्याप ठरली नाही, लवकरच माहिती देऊ: नरेंद्र मोदी

3. नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी रालोआच्या बैठकीला संबोधित करत आहेत, सेंट्रल हॉलमध्ये ‘मोदी मोदी’चा जयघोष

4. देशात सर्वात मोठ्या राजकीय बदलाला सुरुवात झालीय: नरेंद्र मोदी

5. ओडिशा: नवीन पटनाईक येत्या २९ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

6. नवी दिल्ली: काँग्रेस कार्यकारिणीने प्रस्ताव नाकारला तरी राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

7. नवी दिल्ली: नरेंद्र मोदींनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट, सरकार स्थापनेचा केला दावा

8. नाशिक: काठेगल्लीत महिलेची तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

9. औरंगाबाद: कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे अध्यक्ष अनिल देशमुख यांचे शहादा येथे अपघाती निधन

10. आम्ही काँग्रेसप्रमाणे शरणागती पत्करणार नाही: ममता बॅनर्जी
कोलकाता: केंद्रीय दलाने आमच्याविरोधात काम केलं. आणीबाणी सारखी स्थिती निर्माण करण्यात आली. मतांसाठी हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यात आली. आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार केली, पण त्याची दखल घेतली नाही, ममता बॅनर्जींचा आरोप
11. उत्तर प्रदेश: गोंडा येथील एका मुस्लीम कुटुंबात जन्मलेल्या बालकाचे नाव ठेवले नरेंद्र मोदी; २३ मे रोजी झाला बालकाचा जन्म.
12. औरंगाबाद : दौलताबाद परिसरात मनमाड-काचीगुडा पॅसेंजर समोर अज्ञात व्यक्तीची आत्महत्या.

 

आपलं सरकार