Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जातीवाचक मानहानीतून आत्महत्या केलेल्या पायल प्रकरणातील आरोपी फरार, मार्ड कडून सदस्यत्व रद्द

Spread the love

मुंबईच्या प्रसिद्ध नायर हॉस्पिटलमधील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर फरार झाल्याचे वृत्त आहे. डॉ. तडवी यांच्या आत्महत्येनंतर महिला डॉक्टरांविरुद्ध अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर आरोपी डॉक्टर फरार झाल्या असून पोलीस त्यांच्या शोधात आहेत. डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती महिरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल अशी फरार झालेल्या आरोपी महिला डॉक्टरांची नावे आहेत
दरम्यान, नायर हॉस्पिटलध्ये घडलेल्या या प्रकरणानंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) या संघटनेने डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती महिरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तीन वरिष्ठ विद्यार्थिनींकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून जळगावच्या पायल तडवी या दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीनं मुंबईच्या नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी पायलचा मृतदेह जळगावमध्ये आणण्यात आला. त्यावेळी संतप्त नातेवाईकांनी तिचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेला. दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तीन वरिष्ठ विद्यार्थिनींकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून जळगावच्या पायल तडवी या दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीनं मुंबईच्या नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी पायलचा मृतदेह जळगावमध्ये आणण्यात आला. त्यावेळी संतप्त नातेवाईकांनी तिचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेला. दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

पायल तडवी (वय २३) हिनं मुंबईच्या नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. तीन वरिष्ठ विद्यार्थिनींकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून तिनं आत्महत्येचं पाऊल उचललं, असा आरोप करत पायलच्या नातेवाईकांनी तक्रार नोंदवली. याप्रकरणी तिघींविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. आज सकाळी पायलचा मृतदेह जळगावात आणण्यात आला. संतप्त नातेवाईकांनी तिचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेला. या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली.

पायलच्या आई आबिदा या जळगावहून मुंबईत नायर रुग्णालयात आल्या होत्या. त्यांनी सांगितलं की, ‘मी जेव्हा रुग्णालयात आले त्यावेळी तीन डॉक्टर महिलांनी पायलला भेटू दिलं नाही. बुधवारी तिनं मला फोन केला आणि रडायला लागली. तीन वरिष्ठ डॉक्टरांकडून माझा मानसिक छळ होत आहे असं ती सांगत होती.’

पायलच्या नातेवाईकांनी सांगितलं की, ‘पायलच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील संवादाचे पुरावे आम्ही पोलिसांकडे दिले आहेत. तीन वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून तिचा सातत्यानं जातीवरून अपमान केला जात असे.’ नायर रुग्णालयाच्या व्यवस्थापन विभागातील वरिष्ठांनी यासंबंधी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेबाबत ऐकून धक्का बसला. पायलनं याबाबत शिक्षक किंवा रॅगिंगविरोधी समितीकडे कोणतीही तक्रार केली नाही. आम्ही हे प्रकरण पोलिसांकडे सोपवलं आहे. रॅगिंगविरोधी समिती या प्रकरणी तपास करील.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!